वर्धा बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ

By Admin | Updated: October 25, 2015 01:59 IST2015-10-25T01:59:37+5:302015-10-25T01:59:37+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, अंतर्गत वायगाव (नि.) येथे कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.

Launch of cotton procurement at Wardha market committee | वर्धा बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ

वर्धा बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ

४,३०१ रुपयांचा दर : पहिल्या दिवशी ७५० क्विंटलची आवक
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, अंतर्गत वायगाव (नि.) येथे कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी ७५० क्विंटल कापूस आवक झाली असून कापसाला ४ हजार ३०१ रुपयांचा दर देण्यात आला. कोणत्याही प्रकारची कपात न घेता हा दर देण्यात आल्याने शेतकऱ्यांना ४ हजार ४०० रुपये मिळाले.
यावेळी खासदार रामदास तडस, बाजार समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख, संचालक सुरेशसिंग मेहर, कमलाकर शेंडे, प्रकाश पाटील, मुकेश अळसपुरे तसेच रमेश वाळके व चंदू ठक्कर उपस्थित होते. प्रथम क्रमाकांची गाडी असणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
शेतकरी बंधूंनी वर्धा बाजार समितीअंतर्गत असलेल्या परवानाधारक कापूस व्यापाऱ्याकडेच माल विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख व उपस्थित संचालकांनी केले.(प्रतिनिधी)

Web Title: Launch of cotton procurement at Wardha market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.