रामनगर येथील ६० भूखंडांचे अखेर लिज नुतनीकरण

By Admin | Updated: October 9, 2016 00:37 IST2016-10-09T00:37:41+5:302016-10-09T00:37:41+5:30

शहरातील रामनगर येथील लिज धारकांचा मागील २६ वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला.

Last Renewal of 60 Plots at Ramnagar | रामनगर येथील ६० भूखंडांचे अखेर लिज नुतनीकरण

रामनगर येथील ६० भूखंडांचे अखेर लिज नुतनीकरण

पंकज भोयर यांची माहिती : वर्धा नगर पालिकेने जाहीर केली यादी
वर्धा : शहरातील रामनगर येथील लिज धारकांचा मागील २६ वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला. नगर परिषदेने पहिल्या टप्प्यातील ६० नागरिकांच्या भूखंड लिज नुतनीकरणास परवानगी दिली आहे. तत्सम यादीही पालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. उर्वरित प्रकरणे टप्याटप्याने जाहीर करण्यात येतील, असे न.प. प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी पाठपुरावा केला होता.
वर्धा शहरातील रामनगर येथील नागरिकांना राज्य शासनाने लिजवर भूखंडांचे वितरण केले होते; पण १९९१ पासून या भूखंडांचे लिज नुतनीकरण झाले नव्हते. यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते; पण नुतनीकरणाचा प्रश्न निकाली निघत नव्हता. नागरिकांची अडचण लक्षात घेत आ. भोयर यांनी मुख्यमंत्री, नगर विकास राज्यमंत्री, नगरविकास विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवरून नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी याबाबत मुंबई येथे बैठक बोलविली. बैठकीला आ.डॉ. भोयर, भाजपा नेते प्रदीप ठाकूर, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया, न.प. पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या प्रश्नावर गांभीर्याने चर्चा झाली. अखेर नगर विकास मंत्रालयाने १९९१ पासून प्रलंबित असलेल्या नुतनीकरणास मान्यता देत ३० वर्षांची मुदतवाढ दिली. तथापि, येथील नागरिकांच्या भूखंडांचे लिज नुतनीकरणास मान्यता देण्यात आल्याने नगर परिषदेद्वारे लिज त्याबाबत कार्यवाही करण्यात आली; पण काही अडचणींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता.
याबाबत आ. भोयर यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर तो निकाली निघाला. पालिकेने मंगळवारी पहिल्या यादीत ६० नागरिकांना भूखंड नुतनीकरणास परवानगी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)

यांना मिळाला दिलासा
पहिल्या टप्प्यात सीताराम रेवतकर, शांतीकुमार लसणे, ताईबाई पळसापुरे, बापुराव भुसारी, रतन अग्निहोत्री, शंकर कुबडे, श्यामराव खोडके, अनुसया गडेकार, दामोधर गोडे, नरहरी कोमटी, हरिभाऊ गोलावार, विमल भुते, जयवंत देशकर, विनायक काळे, बाजीराव खुणकर, अमृत घाडगे, केशव डाखोळे, श्रीधर फरसोले, प्रभु मून, दत्तात्रय मुंडे, दशरथसिंह चव्हाण, अशोक श्रीरंगवार, पांडुरंग ठाकरे, शंकर बाराहाते, निळकंठ चौधरी, चंपतराव सालंकार, श्यामराव दरणे, गोविंद गव्हाणे, गणपत उमरे, कमलाप्रसाद तिवारी, सदाशिव पडोळे, वामन बोंडे, मानिकचंद धनुस्कर, ओंकार चवडे, गोविंद मांडवगडे, पार्वता परांजपे, दादा नाखले, नारायण काळे, प्रमोद बाळसराफ, मनोहर कोठेकार, सरस्वती सवाणे, रमा रोडे, राजेंद्र रोडे, कुसूम वानखेडे, शांता चौधरी, सिताराम दाते, कपिलदेव सेंगर, श्याम मरघडे, श्याम भाटे, चंपत ठमेकर, शकुंतला गडेकार, शरद गडेकार, वसंत पळसापूरे, भैया पळसापूरे, यादव लोखंडे, तारा पळसापूरे यांचा समावेश आहे.

Web Title: Last Renewal of 60 Plots at Ramnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.