अंतिम दिवस : आज दिग्गजांची उमेदवारी - ४१ नामांकन
By Admin | Updated: September 27, 2014 02:02 IST2014-09-27T02:02:11+5:302014-09-27T02:02:11+5:30
आघाडी व युतीत झालेल्या घटस्फोटानंतर जिल्ह्यात नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.

अंतिम दिवस : आज दिग्गजांची उमेदवारी - ४१ नामांकन
वर्धा : आघाडी व युतीत झालेल्या घटस्फोटानंतर जिल्ह्यात नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. शुक्रवारी चारही विधानसभा क्षेत्रात एकूण २५ जणांनी नामांकन दाखल केले आहे. शुक्रवारपर्यंत चारही विधानसभा क्षेत्रात एकूण ४१ नामांकन दाखल झाले आहे. हिंगणघाटात शिवसेनेकडून अशोक शिंदे, राष्ट्रवादीकडून राजू तिमांडे, भाजपाकडून समीर कुणावार, वर्धेत राष्ट्रवादीकडून सुरेश देशमुख, आर्वी काँग्रेसकडून अमर काळे, देवळीत भाजपाकडून सुरेश वाघमारे या दिग्गजांना आपले नामांकन दाखल दाखल केले आहेत.
नामांकन दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. उर्वरित दिग्गज उमेदवारी दाखल करणार असून शक्तिप्रदर्शनही बघायला मिळणार आहे. हिंगणघाट विधानसभाक्षेत्रातून पाच जणांनी ११ उमेदवारी अर्ज विकत घेतले. आतापर्यंत आठ जणांनी १६ अर्जांची खरेदी केली. देवळी विधानसभा क्षेत्रात भाजपकडून दोन नामांकन दाखल झाले आहे. यात भाजपच्या दिनेश शिरभाते यांचाही समावेश आहे. या विधानसभा क्षेत्रात आज एकूण ११ नामांकन दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत येथे एकूण १४ नामांकन दाखल झाले आहे.
आर्वीत आर्वीत आतापर्यंत सात नामांकन दाखल झाले आहे. तर ९३ अर्जांचंी विक्री झाली आहे. या मतदार संघात भाजपाचा उमेदवार जरी निश्चित असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेच्या उमेदवाराबाबतचा संभ्रम कायम आहे. कोणाच्या पदरात उमेदवारी पडते, याकडे राकाँ व सेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
वर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अजय हेडाऊ, डाव्या लोकशाहीतर्फे स्कर्मिश खडसे, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे किशोर किनकर यांनी नामांकन दाखल केले. भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. विधानसभा निवडणूक जाहीर झाली, त्या काळापासून सुरू असलेल्या युती व आघाडीच्या जागावाटपाचा तिढा गुरुवारी घटस्फोटाने सुटला. हा वाद सुरू असताना आता नामांकन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आली. शेवटच्या दिवशी कितीजण आपले नामांकन दाखल करते, याकडे आता लक्ष लागले आहे. कोण बंडखोरी करतो काय, याकडेही लक्ष लागले आहेत.(प्रतिनिधी)