लोंबकळत्या वीजतारा शेती साहित्यासाठी घातक
By Admin | Updated: June 11, 2016 02:32 IST2016-06-11T02:32:44+5:302016-06-11T02:32:44+5:30
परिसरतील बऱ्याच गावात मुख्य मार्गावर तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या प्रवाहित वीजतारा लोंबकळलेल्या असल्याने

लोंबकळत्या वीजतारा शेती साहित्यासाठी घातक
आगीची शक्यता : महावितरण कंपनीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
वर्धा : परिसरतील बऱ्याच गावात मुख्य मार्गावर तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या प्रवाहित वीजतारा लोंबकळलेल्या असल्याने मानवासोबतच जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
या वीजतारांमुळे शेतीसाहित्याच्या सुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अनेक दिवसांपासून तारांना व्यवस्थित तंगावे नसल्याने देखभाली अभावी तारांची दुरवस्था झालेली आहे. दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरातील अनेक गावात वीजतारा झाडांमधून गेलेल्या आहेत. सोसाट्याचा वारा सुटला की या तारांमध्ये घर्षण होऊन जमिनीवर ठिणग्या पडतात. यात अनेकवार शेतमालाचे नुकसान होण्याच्या, गोठ्याला आग लागण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ग्रामीण भागात पऱ्हाटीचे ढीग, तुराट्या जनावरांकरिता कडबा, कुटार आदी साहित्य खुल्या जागेवरच साठविलेले असते. सोसाट्याचा वारा आल्यास प्रवाहित तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडली तर आग लागण्याची शक्यतस वर्तविली जात आहे. पावसाळ्याला प्रारंभ होत असल्यामुळे वाऱ्याची गती जरा अधिकच असल्याचे दिसून येते. यामुळे झाडांच्या फांद्या तारांवर आदळून तुटतात, जमिनीवरील पडतात. यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी, गामीणांना काळोखातच रात्र काढावी लागते. झाडांच्या फांद्या तोडण्याविषयी वीज वितरण कंपनीकडे मागणी केली. निवेदने सादर दिली तरी त्याचा लाभ नसल्याचे गावकरी सांगत आहेत. विजांच्या तारांतून गेलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)