मालवाहूच्या धडकेत लाईनमन ठार
By Admin | Updated: November 11, 2016 01:45 IST2016-11-11T01:45:05+5:302016-11-11T01:45:05+5:30
भरधाव मालवाहूने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेख बशीर शेख याचा जागीच मृत्यू झाला.

मालवाहूच्या धडकेत लाईनमन ठार
रोहणा : भरधाव मालवाहूने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेख बशीर शेख याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दर्यापूर पांदण रस्त्याजवळ बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
वाढोणा येथून पुलगावकडे जात असलेल्या एम. एच. ३२ एन. ५०२५ क्रमांकाच्या दुचाकीला एम. एच. ३२ क्यू. ३६४३ क्रमांकाच्या मालवाहूने धडक दिली. यात शेख बशीर शेख याचा जागीच मृत्यू झाला. ते वाढोणा येथे लाईनमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला. या घटनेची शेख जुबेर शेख बशीर रा. जाकीर हुसेन कॉलनी पुलगाव यांनी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी मालवाहू चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.(वार्ताहर )