शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जमीन विक्री परवानगी व आदेशावर तहसीलदाराची बनावट सही करून शासनाला लाखोंचा चुना

By विजय.सैतवाल | Updated: February 18, 2024 23:52 IST

या प्रकरणी महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीचे भोगवाटा वर्ग एकमध्ये रुपांतर करुन कृषिकसाठी विक्री परवानगी पत्रावर तसेच विक्री परवानगी आदेशावर महसूल सहाय्यकाने तहसीलदारांची बनावट सही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपये महसुली रकमेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोदवड येथील नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीचे भोगवाटा वर्ग एकमध्ये रुपांतर करून कृषिकसाठी विक्री परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित शेतकऱ्याने अर्ज केला होता. त्यानुसार सदर मिळकतीच्या बाजारभावाच्या मूल्यांकन रकमेच्या ७५ टक्के रक्कम तीन लाख २६ हजार २५२ रुपये सरकारी खजिन्यात जमा करण्याविषयी संबंधित शेतकऱ्यांना २७ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या सहीनिशी कळवण्यात आले होते.त्यानंतर मात्र संबंधित अर्जदारांना ३ नोव्हेंबर २०२३ रोजी बाजारभाव मूल्यांकन रकमेच्या ५० टक्के रक्कम दोन लाख २४ हजार १६३ रुपये सरकारी खजिन्यात जमा करण्याबाबत कळवण्यात आल्याचे तसेच या पत्रावर तत्कालीन तहसीलदार लोखंडे यांनी स्वाक्षरी नसून ती बनावट असल्याचे लक्षात आल्याने अव्वल कारकून गणेश हटकर यांनी नंदुरबार येथे बदली झालेल्या लोखंडे यांना कळवले. त्यांनी जळगावला येऊन या प्रकाराची पाहणी केली असता स्थळ पत्रावर स्थळ प्रत नमूद करताना महसूल सहाय्यक गजानन नरोटे याने तहसीलदारांच्या पदनामाच्या बाजूला स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. या शिवाय सदर जमीन  विक्री परवानगी आदेशावरदेखील बनावट स्वाक्षरी असल्याचे आढळून आले.या सोबतच रावेर तालुक्यातील जिन्सी येथील जमिनीसाठी केलेल्या अर्जाविषयी संचिका जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-ऑफिस प्रणालीमध्ये प्रलंबित असताना ऑफलाईन पद्धतीने तहसीलदार लोखंडे यांची बनावट स्वाक्षरी करून आदेश देण्यात आल्याचे आढळून आले आहे.

ज्याची जबाबदारी त्यानेच केल्या बनावट स्वाक्षरीसंचिकेसंदर्भातील सर्व कामकाज व संचिकेचे अभिलेख जतन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेतील महसूल सहाय्यक गजानन नरोटे यांची असल्याने त्यांनी तत्कालीन तहसीलदार लोखंडे यांना कोणतीही माहिती न देता २३ ऑक्टोबर २०२३ ते २ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान बनावट स्वाक्षरी करून शासनाच्या जमीन महसूल रकमेचे नुकसान केल्याची फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी तहसीलदार पंकज लोखंडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम देशमुख करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी