दारूबंदी महिला मंडळ सदस्य सन्मानित

By Admin | Updated: November 15, 2014 02:00 IST2014-11-15T02:00:35+5:302014-11-15T02:00:35+5:30

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, वर्धा जिल्हा आणि मैत्री साधना प्रतिष्ठान यांच्या द्वारे आयोजित दारूबंदी महिला मंडळ सन्मान सोहळयाचे आयोजन वर्धा शहरानजिकच्या ...

Ladder female board member honored | दारूबंदी महिला मंडळ सदस्य सन्मानित

दारूबंदी महिला मंडळ सदस्य सन्मानित

वर्धा : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, वर्धा जिल्हा आणि मैत्री साधना प्रतिष्ठान यांच्या द्वारे आयोजित दारूबंदी महिला मंडळ सन्मान सोहळयाचे आयोजन वर्धा शहरानजिकच्या साटोडा या गावी करण्यात आले होते.
जिल्ह्यात दारूबंदी असून कारला, आलोडी, नालवाडी, साटोडा गावांमध्ये दारुच्या निर्मितीला जोर आला होता. गावातील अनेक पुरुष मंडळी व्यवसाने अधीन झाली होती. यामुळे व्यक्तींच्या मानसिक, शारिरीक अवस्थांसहित त्याची आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक संबंधावर विपरित परिणाम होत होता. या परिस्थितीचा आढावा घेत ज्ञानेश्वर येवतकर यांनी पुढाकार घेऊन या गावामधील महिला दारूबंदी मंडळ व ग्रामसंरक्षण दलाची स्थापना करून युवा व महिलांचा पुढाकार घेऊन या गावामधील दारूबंदी महिला मंडळ व ग्रामसंरक्षण दलाची स्थापना करून युवा व महिलांचा पुढाकार घेऊन दारू निर्मितीला पूर्णत: आळा घातला. सतत प्रबोधन, जनजागृती व विनंती करुन त्यांनी लोकांना दारू निर्मीतीचा व्यवसाय सोडावयास भाग पाडले. तसेच दारुच्या अधीन झालेल्या अनेक ग्रामस्थांनी स्वेच्छेने दारू सोडली व महिलांच्या अभियानाला सहयोग दिला.
अशा युवा व महिलांच्या कार्याची दखल घेऊन ज्ञानेश्वर येवतकर यांनी पुढाकार घेऊन या महिला व युवा कार्यकर्त्यांना सन्मान सोहळा घडवून आणला. या सम्मान सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपअधीक्षक संतोष वानखेडे, अध्यक्षस्थानी रघुनाथ शाहू तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम पोलीस ठाणेदार पराग पोटे, मोरे महाराज, किशोर निलियम, पवन शाहू यासोबत पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना उपअधीक्षक संतोष वानखेडे म्हणाले, वर्धा जिल्ह्यात दारू विक्रीला उधाण आले आहे. मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. यावर बंदी आणण्यासाठी आमचे पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहे. आम्हाला दारू आणि व्यसनमुक्तीसाठी गावाच्या सहकार्याची गरज आहे. वर्धा जिल्ह्यातील गावातील महिला मंडळ व ग्राम संरक्षण दलांनी पुढे आल्यास पोलीस प्रशासन त्यांना मदत करायला तयार आहे असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे
कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर येवतकर यांनी केले. यशस्वीतेकरिता नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य, मैत्री साधना प्रतिष्ठाण, जय महाकाली दारूबंदी महिला मंडळ, साटोडा, समानता दारूबंदी महिला मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, महिला दारूबंदी मंडळ, आलोडी, सोटोडा कारला तसेच साटोडा गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती. दारूबंदीसाठी गावातील नागरिक सर्वतोपरी या कामासाठी सहकार्य करतील, असे मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ladder female board member honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.