शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मजुरीच्या शोधात आलेय परजिल्ह्यातील मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:57 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.

ठळक मुद्देस्थलांतरण : गावातील कामांना मिळाली गती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. या पिकांची सध्या सोगणी व मळणी सुरु आहे. याच कालावधीत कापूस वेचणीलाही सुरुवात होत असल्याने गावागावांमध्ये मजुरांची समस्या भेडसावतात. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात गडचिरोली, वाशिम, पुसद या भागातील मजुरांचे जत्थे गावागावांमध्ये दाखल होत आहे.यात महिला, पुरुष व तरुणांचाही समावेश आहे. दरवर्षी या भागातील मजुर जिल्ह्यात दाखल होऊन सोयाबीन सोगणी, मळणी व कापूस वेचण्याचेही काम करतात. या दिवसांमध्ये हे मजूर गावात मिसळून जात असल्याने गावकऱ्यांसोबत त्यांची चांगलीच ओखळ झाली आहे. त्यामुळे तेच मजुर दरवर्षी गावात येऊन गावातील शेतकऱ्यांच्या कामात हातभार लावतात. तसेच या दरम्यान येणाऱ्या नवरात्री व दिवाळीच्या सणात सहभागी होऊन सहकार्यही करतात. त्यामुळे राहिलं तितके दिवस ते या गावाचा एक भागच होऊन जाते.या मजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासाया दिवसामध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची सोगणी व कापसाची वेचणी येत असल्याने मजूरांची कमतरता भासते.परिणामी गावातील मजूरांचेही भाव चांगलेच वाढते. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील मजुरांचे आगमण झाले की, शेतकऱ्यांचाही भार हलका होतो. त्यांना वेळेत आणि योग्य दरात मजूर उपलब्ध होत असल्याने, या पर जिल्ह्यातील मजूरांमुळे दिलासा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.शेतकरीच करतात राहाण्याची व्यवस्थासोयाबीनच्या सोगणीचे दिवस आले की, गडचिरोली, बालाघाट, वाशिम व पुसद परिसरातील मजूर जिल्ह्यातील विविध खेड्यामध्ये दाखल होतात. सोयाबीनची सोगणीचे काम एकराप्रमाणे घेऊन सर्व मजूर मिळून अल्पावधीच तडीस नेतात. दिवाळीपर्यंत त्यांचे वास्तव्य असते. गावातील शेतकरीच त्यांची राहण्याची व्यवस्था करतात. गावातील जो शेतकरी त्यांना काम देईल त्या शेतकऱ्याचे ते काम पूर्ण करुन दिवाळी करिता आपापल्या गावाला जातात. दिवाळीनंतरही काही मजूर पुन्हा परत येऊन घेतलेले काम पूर्ण करतात.आमच्याकडे धानाचीच शेती असल्याने आमच्याकडे सध्या पाहिजे तसा रोजगार मिळत नाही. घरातीत सदस्यांची संख्याही जास्त असल्याने दररोज कामाला गेल्याशिवाय दोन पैसे हातात पडत नाही. या दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीमुळे चांगला रोजगार मिळत असल्याने आम्ही परिवारासह इकडे येऊन काम करतो.- रामेश्वर कोरचे, शेतमजूर गडचिरोली