शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
5
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
6
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
7
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
8
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
9
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
10
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
11
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
13
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
14
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
15
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
17
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
18
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
19
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
20
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून हिवरा गावात जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:23 IST

कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.वॉटर कप स्पर्धेत केवळ ४१६ लोकसंख्या असलेल्या हिवरा गावाने सहभाग घेतला तो, जलदूत डॉ. उल्हास जाजू यांच्या सहकार्यामुळेच. पाणी असेल तर शेती टिकणार आणि पावसाच्या पाण्याने शेतातील माती वाहून जाईल तर सुपिक जमिनी नष्ट होईल, याकरिता पाणी व शेतमाती हे दोन्ही टिकवून ठेवणे गरजेचे होते. अशावेळी हिवरा येथील परस्परविरोधी तीन गटांना एकत्रित आणून त्यांच्यापुढे जलक्रांतीची संकल्पना मांडणे डॉ. जाजू यांच्याकरिता आव्हानच होते. पण, त्यांनी शेती व पाण्याचे महत्त्व पटवून देत संपूर्ण गाव श्रमदानाकरिता एकत्रित करून जलयोद्धा पथक तयार केले आणि तेथूनच खºया जलक्रांतीला सुरूवात झाली.हिवरा गावापासून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या खोदकामाला सुरूवात झाली, हे काम अधिक गतीने व्हावे, म्हणून अख्खे गावच टोपले, टिकास, फावडे घेऊन कामाला लागले. एकीकडे ४६ अंशांच्या तापमानात ग्रामस्थांच्या शरीरातून घामाचे थेंब टपकत होते, तर दुसरीकडे मशिनीद्वारे खोदकाम सुरू होते. आठवडाभर केलेल्या परिश्रमानंतर नाल्यालाच पाझर फुटला, आज या नाल्यात सुमारे सहा ते सात फूट पाणी आहे.हे श्रमदान येथेच थांबले नाही, तर पावसाच्या पाण्याने ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जाते अशा शेतकºयांच्या शेतात संपूर्ण गावातील नागरिकांनी श्रमदान करून शेतात समतल बांध तयार केले. सुमारे २० शेतकºयांच्या ५० एकर शेतात बांध तयार केल्याने आता पावसाचे पाणी हे शेतातच मुरणार असून, शेतातील मातीही वाहून जाण्यास अटकाव होणार आहे. प्रबळ इच्छाशक्तीने धनी असलेल्या हिवरा ग्रामस्थांनी श्रमदानातून गावालगतच्या शेतात, शासकीय जमिनीवर विविध आकाराचे तब्बल सात तलावांची निर्मिती केल्याने पाऊसपाण्याच्या संवर्धनासोबत मातीचेही संवर्धन होणार आहे.जल है तो कल है, हे सर्वांना ज्ञात तर होते; पण आपण अशी काही क्रांती करू शकतो, यापासून ग्रामस्थ दूर होते. आज गावात आनंदाचे वातावरण आहे. याचे कारणही ग्रामस्थच आहे. आठ वर्षांपासून तर ६० वर्षांपर्यंतच्या ग्रामस्थांनी श्रमदानात घाम ओतला. डॉ. जाजू यांच्या मार्गदर्शनामुळेच हिवरा हे गाव सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सहभागी आहे. पुरस्काराच्या रकमेच्या अपेक्षेपेक्षा गावाने आज एकत्रित होत जलक्रांती घडवून आणली. त्यामुळे आगामी शेकडो वर्ष गावापासून पाणीप्रश्न दूर राहणार आहे.अक्षय बाळसराफ, जलयोद्धा टीम, हिवरा.स्वास्थ्य सेवा हे माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचायला. स्वास्थ्याचे प्रश्न सुटले तर गावाचे प्रश्न सुटतात, असे नाही. त्यांचे मूलभूत प्रश्न पोटाशी, शेतीशी संबंधित आहे. गावकरी जर उभा राहायचा असेल तर शेतीच्या जोरावरच उभा राहू शकतो आणि शेतीला आवश्यक आहे पाणी. शासनासोबतच समाजसेवी संस्थांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीला हिवरा ग्रामस्थांकडून मिळालेली श्रमदानाची साथ, यामुळेच जलक्रांती होऊ शकली.डॉ. उल्हास जाजू, जलदूत

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा