रोटरी उत्सवात चाकू हल्ला; दोघे जखमी
By Admin | Updated: January 12, 2015 22:57 IST2015-01-12T22:57:14+5:302015-01-12T22:57:14+5:30
येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या रोटरी उत्सवात राविवारी रात्री वाद झाला. या वादात झालेल्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी झाले. ही घटना रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

रोटरी उत्सवात चाकू हल्ला; दोघे जखमी
वर्धा : येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या रोटरी उत्सवात राविवारी रात्री वाद झाला. या वादात झालेल्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी झाले. ही घटना रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींवर सेवाग्राम व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोटरी क्बल आॅफ गांधी सिटीच्यावतीने लोक महाविद्यालयाच्या मैदानावर रोटरी उत्सव सुरू आहे. या उत्सवात रविवारी रात्री गर्दीत मुंजेवार नामक युवकाचा अजय ठाकूर याला धक्का लागल्याने दोघात वाद झाला. या वादात अजय याने मुंजेवार याला मारहाण करणे सुरू केले. हा वाद सोडविण्याकरिता मुंजेवार याच्यासोबत असलेले त्याचे सहकारी ऋषिकेश नक्षीणे व किरण ठमेकर हे दोघेमध्ये पडले. यावेळी अजय व त्याच्या सहकाऱ्यांनी या दोघांवर चाकू हल्ला केला. यात ऋषिकेश याच्या पोटावर दोन वार करण्यात आले तर किरण याच्या पाठीवर चाकूचा वार करण्यात आला.
घटना घडताच किरण याने शहर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणाची तक्रार केली. तर ऋषिकेश याला थेट सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले. किरण याला पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या प्रकरणी अद्याप एकही मारेकरी पोलिसांच्या हाती आला नसल्याची माहिती ठाणेदार एम. बुराडे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)