बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
By Admin | Updated: January 18, 2017 00:37 IST2017-01-18T00:37:26+5:302017-01-18T00:37:26+5:30
येथील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गोहदा शिवारात गोठ्यात बांधून असलेल्या कालवडावर हल्ला चढवून ठार केले.

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
बोरधरण : येथील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गोहदा शिवारात गोठ्यात बांधून असलेल्या कालवडावर हल्ला चढवून ठार केले. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली.
गोहदा शिवारात अतुल गुरूनुले यांच्या शेतातील गोठ्यात जनावरे बांधून होती. बिबट्याने गोठ्यातील कालवडावर हल्ला चढविला. ही घटना सोमवारी रात्री घडली. बिबट्याने कालवडीला ठार करून अमर कोकाटे यांच्या ऊस असलेल्या शेतामध्ये ओढत नेले. बिबट ऊसामध्ये दडून बसल्याची शंका असल्याने वन विभागाने त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. घटनेची माहिती गुरूनुले यांनी वनविभागाला देताच क्षेत्र सहायक गणेश कावळे, वनरक्षक सुनील कोटजायरे, वनमजूर कोल्हे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. यामुळे गोहदा, सालई, पेवठ, बोरी शिवारात बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.(वार्ताहर)