अपहरण करून वृद्धाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:15+5:30

रामभाऊ किसन नेवारे (६२) रा. जामठा, जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. हे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी आजनगाव-बोंदुर्णी रस्त्यालगतच्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सरपंच विठ्ठल बेनिवार यांनी वडनेर पोलिसांना माहिती दिली.

Killing an old man by kidnapping | अपहरण करून वृद्धाची हत्या

अपहरण करून वृद्धाची हत्या

ठळक मुद्देमृतदेह फेकला नाल्यात : आजनगाव-बोदुर्णी मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेर : एका वृद्धाचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली. तसेच त्यांचा मृतदेह आजनगाव-बोंदुर्णी रस्त्यालगतच्या नाल्यात फेकून दिला. ही घटना मग्ांळवारी सकाळी ७वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून आणखी आरोपी असल्याची पोलिसांनी शक्यता वर्तविली आहे.
रामभाऊ किसन नेवारे (६२) रा. जामठा, जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. हे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी आजनगाव-बोंदुर्णी रस्त्यालगतच्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सरपंच विठ्ठल बेनिवार यांनी वडनेर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार आशिष गजभिये, अजय देठे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
मृताचा चेहरा दगडाने ठेचला असल्याने ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मृताच्या कपड्यांची तपासणी केली असता एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीवर असलेल्या पत्तावरुन त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून घटनास्थळी बोलाविण्यात आले. मृत रामभाऊ यांचा मुलगा रामचंद्र याने मृतदेह वडील रामभाऊ यांचा असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी पुढील तपासला गती दिली. याप्रकरणी सागर येठी, रा.जामठा याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणामध्ये आणखी तीन आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वडनेर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सखोल तपास सुरु केला आहे.

जादूटोण्याच्या संशयातून घडला थरार?
मृत रामभाऊ नेवारे यांच्या परिवाराने दोन दिवसापूर्वी हिंगणा पोलिसात तक्रार दाखल करुन अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यावरुन पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. रामभाऊ यांचा मृतदेह सापडल्यानंतर वडनेर पोलिसांनी तपासला गती देत सागर येठी, रा.जामठा याला ताब्यात घेतले. सागरची प्रकृती नेहमीच खराब राहत होती. त्यामुळे रामभाऊ यांच्यावर जादुटोणा केल्याचा संशय घेऊन त्यांचे अपहरण करीत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. याच दिशेने पोलिसही तपास करीत असल्याचे सांगितले जात आहे.

पाच दिवसात दुसरी हत्या
हिंगणघाट तालुक्यामध्ये जादुटोण्याच्या संशयावरुन गेल्या पाच दिवसामध्ये झालेली ही दुसरी हत्या आहे. यापूर्वी सिंदी (रेल्वे) नजिकच्या बोरगाव येथे कवडू रंगभान पंधरे याची हत्या करण्यात आली आहे. त्या घटनेच्या तपासादरम्यान काही व्यक्तींना चौकशीकरिता ताब्यात घेतले असतानाच आजनगाव-बोंदुर्णी येथे दुसऱ्या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी पुढील तपासाकरिता वडनेरचे पोलीस पथक नागपूरला रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Killing an old man by kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून