गोठ्यात पती-पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:14+5:30

ओलीताची सात एकर शेती असून चार एकरात चणा व ३ एकरात कपाशीची लागवड केली आहे.रात्रीला ओलीत आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता दोघेही पती-पत्नी रात्रीला शेतात जागलीला जात. या दाम्पत्याला दोन मुले असून दोघेही बांधकामाचे काम करीत असल्याने आपापले कुटूंब घेऊन ते वेगवेगळे राहतात.

Killing husband and wife in a shed | गोठ्यात पती-पत्नीची हत्या

गोठ्यात पती-पत्नीची हत्या

ठळक मुद्देडोरली शिवारातील घटना : दोघेही शेतात रात्रीला करायचे जागली

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोरली येथील शेतशिवारातील गोठ्यात पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे ही घटना उघडकीस आली असून दोन दिवसांपूर्वीच त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शेतकरी महादेव लक्ष्मण खिरडकर (६०) व पत्नी लक्ष्मी महादेव खिरडकर (५५) रा. डोरली असे मृत शेतकरी पती-पत्नीचे नाव आहे. त्यांच्याकडे ओलीताची सात एकर शेती असून चार एकरात चणा व ३ एकरात कपाशीची लागवड केली आहे.रात्रीला ओलीत आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता दोघेही पती-पत्नी रात्रीला शेतात जागलीला जात. या दाम्पत्याला दोन मुले असून दोघेही बांधकामाचे काम करीत असल्याने आपापले कुटूंब घेऊन ते वेगवेगळे राहतात.
त्यांचे शेतशिवारातील सर्व शेतकऱ्यांशी चांगले संबंध होते. त्यांचा कुणासोबतही काही वाद नव्हता. आपल्या कामातच व्यस्त राहणाºया या दोन्ही पती-पत्नींची शेतातच हत्या करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांना धक्का बसला.
मंगळवारी सकाळी परिसरात दुर्गंधी पसरल्याने पोलीस पाटील निलेश गुजरकर यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. तत्काळ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांना शेतातील गोठ्यात शेतकरी महादेव लक्ष्मण खिरडकर व पत्नी लक्ष्मी या दोघांचा मृतदेह आढळून आला.
महादेव यांचा चेहरा विद्रुप झाला असून त्याची हत्या दगडाने ठेचून तर पत्नी लक्ष्मीच्या गळ्यावर कपाशी काढण्याचा लोखंडी चिमटा दाबून हत्या केल्या संशय घटनास्थळावर दिसून आलेल्या परिस्थितीनुसार व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहांची अवस्था बघता दोघांचीही हत्या रविवारीच रात्री झाली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या हत्येचे कारण काय, या शोध घेणे पोलिसांपुढे आव्हानच ठरणार आहे. सेलू पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून श्वानपथकाच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत आहेत.

गावात हळहळ; शवविच्छेदनानंतर होणार उलगडा
पोलिसांनी घटनास्थळावरुन पती-पत्नीचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे. आता शवविच्छेदनानंतर त्यांची हत्या कशाने व केव्हा झाली असावी याचा उलगडा झाल्यानंतरच पोलिसांना तपासाची दिशा ठरविता येणार आहे.
मृत महादेव खिरडकर यांचा मुख्य व्यवसाय राजकाम होता. घरबांधकाम करीत असताना त्यांचा अपघात झाल्याने ते अपंग झाले. नंतर त्यांनी या व्यवसायाकडे दुर्लक्ष करुन शेती कसायला सुरुवात केली. चांगले उत्पन्न घेण्यासाठी सतत धडपडणाºया पती-पत्नीची हत्या झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. माहिती मिळातच अख्खा गाव घटनास्थळावर गोळा झाला होता.
 

Web Title: Killing husband and wife in a shed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून