अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्याला अटक
By Admin | Updated: April 27, 2015 01:39 IST2015-04-27T01:39:47+5:302015-04-27T01:39:47+5:30
येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याला जाम येथून रविवारी सापळा रचून समुद्रपूर पोलिसांनी जेरबंद केले. दिलीप गुणवंत पोयाम (२६) असे अटकेत असल्याचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्याला अटक
समुद्रपूर : येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याला जाम येथून रविवारी सापळा रचून समुद्रपूर पोलिसांनी जेरबंद केले. दिलीप गुणवंत पोयाम (२६) असे अटकेत असल्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप याने २३ मार्च २०१५ ला समुद्रपूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. तब्बल एक महिन्यानंतर तो जाम येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. दिलीपवर भांदविच्या कलम ३६३, ३६६, ३७६ व बाल लैगिंक अत्याचार संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. सदर कारवाई ठाणेदार अनिल जिट्टावार, पीएसआय अशोक माहूरकर, नितीन चिंचोणे, अजय घुसे यांनी केली.(तालका प्रतिनिधी)