कोरम असताना केली ग्रामसभा तहकूब

By Admin | Updated: October 4, 2015 02:57 IST2015-10-04T02:57:17+5:302015-10-04T02:57:17+5:30

म. गांधी जयंतीदिनी आयोजित ग्रामसभेला कोरम असताना सरपंचांनी सभा तहकूब केली.

Kelly Gram Sabha Court | कोरम असताना केली ग्रामसभा तहकूब

कोरम असताना केली ग्रामसभा तहकूब

चौकशीची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन
सेलू : म. गांधी जयंतीदिनी आयोजित ग्रामसभेला कोरम असताना सरपंचांनी सभा तहकूब केली. यामुळे शनिवारी नागरिकांनी पं.स. कार्यालयात निवेदन सादर करीत कारवाईची मागणी केली.
घोराड ग्रा.पं.ची ग्रामसभा सकाळी ९ वाजता होती. सभेला ५०० हून अधिक नागरिक हजर होते; पण ग्रामविकास अधिकारी हजर नसल्याचे सांगून सभा तहकूब करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांनी सरपंचावर कारवाईची मागणी केली. पं.स. सदस्य रजनी तेलरांधे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी अधिकारी येतील, असे सांगितले; पण ११ वाजेपर्यंत कुणीच आले नाही. यामुळे नागरिकांनी सहा. गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली; पण त्यांनी मार्गदर्शन करण्यास असमर्थता दर्शविली. विस्तार अधिकाऱ्यांना नागरिकांनी ग्रामसभेत आणले; पण त्यांनी सभा सुरू करण्यास नकार दिला. ग्रा.पं. कर्मचारी व नंतर कृषी सहायकाची प्रोसेडींग लिहिण्यास निवड केली; पण सरपंच मंजुरी देईपर्यंत सभा सुरू करता येत नसल्याचे सांगितले. यामुळे ग्रामस्थ संतप्त आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Kelly Gram Sabha Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.