कारवीचे रानफूल, दाजीपुरात निळी झूल
By Admin | Updated: October 20, 2016 01:03 IST2016-10-20T01:03:19+5:302016-10-20T01:03:19+5:30
दाट धुक्याच्या दुलईमध्ये निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेली ही रानफुले आता पुन्हा सात वर्षांनीच फुलणार आहेत.

कारवीचे रानफूल, दाजीपुरात निळी झूल
वर्धा : स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत स्थानिक न्यू आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज आॅफ वर्धा मधील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत नालवाडी येथे विविध उपक्रम राबवून प्रबोधनाचे कार्य केले.
विद्यार्थ्यांनी नालवाडी गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या मुलभूत समस्यांबाबत माहिती संकलनाचे कार्य केले. गावातील काही वॉर्डामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. समाजकार्याच्या क्षेत्रकार्यकर्त्यांनी गावामध्ये जाऊन विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले व या माध्यमातून गावकऱ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली. तसेच तेथील अंगणवाडीचा परिसर स्वच्छ करून कचऱ्याचा योग्य विल्हेवाट लावण्यात आला. या अभियानाला अंगणवाडी सेविका अनिता भांनसे, मदतनीस प्रज्ञा गायगवले तसेच समाजकार्य विभागप्रमुख प्रा. मनिष भोयर, मार्गदर्शक रश्मी पइडके उपस्थित होते. वैभव गवळी, कुंदन नाटकर, नेहा कामडी, रेणुका लांडे, जया सोनवणे, संदीप इंगळे, फिरदोस खान, जीवन येळणे, आकाश कांबळे, पल्लवी दबडे, कपिल बोथले सहभागी झाले होते.(स्थानिक प्रतिनिधी)