काजीपेठ-पुणे एक्सप्रेस हिंगणघाटला थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:10 IST2018-03-07T00:10:00+5:302018-03-07T00:10:00+5:30
गत वर्षी दिवाळी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या पुणे-काजीपेठ-पुणे या साप्ताहिक गाडीचा हिंगणघाट रेल्वेस्थानकावर थांबा नाही. या गाडीचा येथे थांबा देण्याच्या मागणीकरिता हिंगणघाटकरांकडून अनेकवार आंदोलने झाली.

काजीपेठ-पुणे एक्सप्रेस हिंगणघाटला थांबणार
ऑनलाईन लोकमत
वर्धा : गत वर्षी दिवाळी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या पुणे-काजीपेठ-पुणे या साप्ताहिक गाडीचा हिंगणघाट रेल्वेस्थानकावर थांबा नाही. या गाडीचा येथे थांबा देण्याच्या मागणीकरिता हिंगणघाटकरांकडून अनेकवार आंदोलने झाली. यावरून खा. रामदास तडस यांनी रेल्वे मंत्र्यांशी भेटून चर्चा केली. या थांब्याबाबत रेल्वे मंत्रालय अनुकूल असून लवकरच या सुपरफास्ट गाडीला थांबा मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.
नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन खा. तडस यांनी हिंगणघाट रेल्वेस्थानकावर काजीपेठ पुणे एक्सप्रेसला थांबा देण्याबाबत आग्रह धरला. सोबतच हिंगणघाट ही ‘अ’ दर्जा असलेली नगरपालिका असून जिल्हयातील एक प्रमुख तहसील मुख्यालय आहे. या गोष्टीकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांनी या विषयावर आपली सकारात्मकता दाखवून काजीपेठ-पुणे एक्सप्रेसचा थांबा मंजुरीच्या कार्यवाहीकरिता संबधीताला आदेशीत केले.
या पूर्वी देखील सिंदी (रेल्वे), पुलगांव, चांदूर (रेल्वे) येथे अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेले थांबे आपल्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यावरून खा. रामदास तडस यांनी मंजूर केले. हिंगणघाट रेल्वे स्थानकाला या विषयी लवकरच न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.