अवघ्या सात तासांत १६ हजार ९५५ व्यक्तींनी घेतली कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST2021-07-18T05:00:00+5:302021-07-18T05:00:11+5:30
शनिवारी एकूण ९१ केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. सकाळी ९ वाजतापासून प्रत्येक केंद्रावरून लस देण्यास सुरूवात झाली. सकाळपासूनच लस घेणाऱ्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. शनिवारी दुपारी ५ पर्यंत लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असली तरी दुपारी ४ वाजेपर्यंत ९१ केंद्रांवरून तब्बल १६ हजार ९५५ व्यक्तींनी लस घेतल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

अवघ्या सात तासांत १६ हजार ९५५ व्यक्तींनी घेतली कोविड लस
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोमवारी एकाच दिवशी १३ हजार ३८९ व्यक्तींना कोविड व्हॅक्सिन देऊन जिल्ह्यात लसीकरणाचा विक्रम नोंदविणाऱ्या आरोग्य विभागाने याच आठवड्यात शनिवारी एकाच दिवशी अवघ्या सात तासांत १६ हजार ९५५ व्यक्तींना कोविड व्हॅक्सिन देऊन नवा विक्रम नोंदवित आपण लसीकरण मोहिमेला आणखी किती गती देऊ शकतो याची क्षमताच सिद्ध करून दाखविली आहे. विशेष म्हणजे शनिवारी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्तच प्रतिसाद दिला.
शुक्रवारी जिल्ह्याला कोविड लसीचे १८ हजार डोस मिळताच जिल्हा आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेला नव्या जोमाने गती देण्याचे निश्चित करून शनिवारी प्रत्यक्ष कृती केली. शनिवारी एकूण ९१ केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. सकाळी ९ वाजतापासून प्रत्येक केंद्रावरून लस देण्यास सुरूवात झाली. सकाळपासूनच लस घेणाऱ्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. शनिवारी दुपारी ५ पर्यंत लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असली तरी दुपारी ४ वाजेपर्यंत ९१ केंद्रांवरून तब्बल १६ हजार ९५५ व्यक्तींनी लस घेतल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. शनिवारी लसीकरण केंद्र बंद होईपर्यंत नेमक्या किती व्यक्तींना कोविड व्हॅक्सिन देण्यात आली याची आकडेवारी गोळा करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. शनिवारी जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर पुरुषांच्या बरोबरीने महिला तसेच तरुणींनीही स्वयंस्फूर्तीने कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली, हे विशेष.
६,४९८ व्यक्तींनी अपॉईमेंट घेवून घेतली व्हॅक्सिन
- शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल १६ हजार ९५५ व्यक्तींनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली असून यापैकी ६ हजार ४९८ व्यक्तींनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करून अपॉईमेंट घेत नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे आारोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शनिवारी जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला नव्या जोमाने गती देण्यात आली. नागरिकांनीही लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिल्याने आज एकाच दिवशी १६ हजार ९५५ व्यक्तींना दुपारी ४ वाजेपर्यंत कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. दुपारी ५ पर्यंत किती लसीकरण झाले याची माहिती सध्या गोळा केली जात आहे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा.