पदोन्नतीसाठी साझ्यांचे काम ठप्प

By Admin | Updated: February 4, 2015 23:20 IST2015-02-04T23:20:14+5:302015-02-04T23:20:14+5:30

जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी

Junk work for promotion | पदोन्नतीसाठी साझ्यांचे काम ठप्प

पदोन्नतीसाठी साझ्यांचे काम ठप्प

वर्धा : जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी कार्यरत आहे़ यातही तलाठ्यांनी पदोन्नतीची मागणी करीत साझ्यांचेच काम बंद करण्याचा इशारा दिला़ यामुळे प्रशासनाची गोची झाली आहे़
जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून वर्धा तालुक्यात ४१ पदे आहेत़ एकूण ९ पदे रिक्त असून वर्धा तालुक्यातीलच चार पदे रिक्त आहेत़ शिवाय अन्य तालुक्यातीलही पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी भटकंती करावी लागते़ सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे़ या समस्यांशी दोन हात करण्याकरिता शेतकऱ्यांना शासनाने थोडाफार मदतीचा हात दिला आहे़ यातील माहिती तलाठ्याकडे असून तेच नसल्याने शेतकरी हतबल आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
तलाठ्यांचे अतिरिक्त साझ्यांचे काम बंद; शेतकरी त्रस्त
कारंजा (घाडगे) - तलाठ्यांनी अतिरिक्त साझ्याचे काम बंद केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे़ तालुक्यातील पाच तलाठी साझे सध्या तलाठ्याविना आहेत़ याकडे तहसील कार्यालयासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे़ पाच तलाठी साझ्यांची तलाठी पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत़ शिवाय कोतवाल मंडळ अधिकारी ही पदेही रिक्त आहेत़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़
कारंजा तालुक्यातील पाच तलाठी साझ्यांमध्ये धर्ती, बोटोणा, चंदेवाणी, पांजरागोंडी, हेटीकुंडीचा समावेश आहे़ या साझ्यांतील तलाठी पदे रिक्त आहेत़ या साझ्यांचा अतिरिक्त कार्यभार ज्या तलाठ्यांकडे देण्यात आला होता, त्यांनी अतिरिक्त साझ्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे़ विदर्भ पटवारी संघाच्यावतीने वारंवार लेखी निवेदने देऊनही आणि विनंती करूनही तलाठ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्यानेही तलाठ्यांनी हा निर्णय घेतला आहे़

Web Title: Junk work for promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.