कामगारांना न्याय द्या अन्यथा रेल्वे रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:00 AM2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:09+5:30

वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वात मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन पंधरा दिवसात समस्या सोडवा अन्यथा रेल्वेरोको आंदोलन करणार, असा इशारा स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

Judge the workers or else the railway will stop | कामगारांना न्याय द्या अन्यथा रेल्वे रोखणार

कामगारांना न्याय द्या अन्यथा रेल्वे रोखणार

Next
ठळक मुद्देधडक मोर्चा : प्रशासनाला कामगार संघटनेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यासंदर्भात वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वात मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन पंधरा दिवसात समस्या सोडवा अन्यथा रेल्वेरोको आंदोलन करणार, असा इशारा स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
ग्रामसेवकाने चौकशी करुन बांधकाम कामगारांना विनाविलंब प्रमाणपत्र द्यावे. शासनासह जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाºया ग्रामसेवकावर कठोर कारवाई करावी. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभार्थी प्रकरणे त्वरीत निकाली काढावे. वर्धा येथे सरकारी कामगार कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी द्यावा. दोन मुलींच्या विवाहाकरिता नोंदणीकृत कामगारांना प्रतीविवाह ५१ हजार रुपये अनुदान विवाहापश्चात महिन्याभरात द्यावे. कामगारांना सुरक्षासंच व अत्यावश्यक सुविधा त्वरित सुरु कराव्यात.
पदविका शिक्षण व औद्यागिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना त्वरित सुरु कराव्यात.सरकारी कामगार कार्यालयात मनमानी कारभार करणाºया कर्मचाºयांची हकालपट्टी करावी तसेच नोंदणीकृत संघटनेकडून कामगारांचे विविध अर्ज स्वीकारण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालयातून मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
यावेळी हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य व्दारापुढेच अडविण्यात आला. स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाला आमदार डॉ.पंकज भोयर व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी संबोधित केले. त्यानंतर आमदार डॉ. पंकज भोयर, राजेश बकाने व उमेश अग्निहोत्री यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देऊन विविध समस्यांचे निकारण करण्याची मागणी केली. या मोर्चात शशिकांत नाईक, राजू मुठाळ, दिलीप कोरे, सुरेश पिसे, नरेंद्र मानकर, आशिष बुरबुरे, मारोती मुठाळ, संगिता गोडे, सुरेश राजनकर, शोभा मेंढे व विजय आष्टनकर यांच्यासह असंख्य बांधकाम कामगार उपस्थित होते.
 

Web Title: Judge the workers or else the railway will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.