आनंदी कट्ट्यात रंगली आषाढातील काव्यगीत मैफल

By Admin | Updated: August 1, 2016 00:38 IST2016-08-01T00:38:10+5:302016-08-01T00:38:10+5:30

‘आनंद देणे, आनंद घेणे समन्वयात या जीवनाचे मधुर गाणे’ ही अनुभूती आनंदी कट्ट्यातील ‘लेणे निसर्र्गाचे देणे ....

A joyous concert dance | आनंदी कट्ट्यात रंगली आषाढातील काव्यगीत मैफल

आनंदी कट्ट्यात रंगली आषाढातील काव्यगीत मैफल

लेणे निसर्गाचे, देणे आषाढाचे : ज्येष्ठांनी जिंकली श्रोत्यांची मने
वर्धा : ‘आनंद देणे, आनंद घेणे समन्वयात या जीवनाचे मधुर गाणे’ ही अनुभूती आनंदी कट्ट्यातील ‘लेणे निसर्र्गाचे देणे आषाढाचे’ या काव्य स्वर मैफलीतून झाली. या स्वरगंगेत रसिक श्रोते चिंब झाले. आषाढ मासाचे औचित्य साधून आनंदी कट्टा या मंचाद्वारे स्वाध्याय मंदिर येथे स्वरमैफल व ज्येष्ठांच्या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपपोलीस अधीक्षक रवींद्र किल्लेकर, मुंबईचे नीरज खेडकर, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. साहूहिक प्रार्थना व मावळत्या दिनकरा या अवन्तिका ढुमणे हिच्या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. ‘पुष्पगुच्छ’ या काव्यसंग्रहानिमित्त प्रभाकर पाटील यांचा आनंदी कट्टातर्फे शाल, श्रीफळ, रोप देऊन सत्कार करण्यात आला. अवन्तिका, तन्वी गलांडे, नेहा गावंडे, जान्हवी सालोडकर, हार्मोनियम वादक शैलेश जगताप, तबला वादक अजय गलांडे यांना किल्लेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पाटील यांनी पंढरीची वारी कवितेचे वाचन केले. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी कलागुणांचे सादरीकरण केले. चंद्रशेखर पवार यांनी प्रबोधनात्मक काव्य वाचन, मोहन चिचपाने यांनी विनोदी किस्से सांगून रसिकांना हसविले. डॉ. भीमराव भोयर यांनी पर्यावरणावर काव्य सादर केले. कमला वाशिमकर यांनी पहेली सादर करून रसिकांना विचारात गुंतवून ठेवले. रोहण्याच्या शोभा कदम यांनी काव्य गायनातून शेतकरी जीवनाचे चित्र साकारले. शत्रुघ्न मून यांनी चित्रपट गीत गाऊन गायक मुकेश यांना स्वरांजली अर्पण केली. यानंतर वसंत उघडे व दिलीप गायकवाड यांनी काव्य गायन केले. कहाते यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. शांता पावडे यांच्या कवितेने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आयोजन व निवेदन संगीततज्ञ संध्या देशमुख यांनी केले.
आषाढातील पाऊस सरींचे आज वाजत गाजत, वर्षोत्सव मांडीयला या अनंत भीमनवारांच्या गीताने स्वागत केले. अवंतिकाच्या स्वरचित काव्यातून पावसाचे सुंदर रूप साकारले. नेहा गावंडे हिने राग मियामल्हारमधून घन बरसो रे ही मैथिलीशरण गुफांची रचना, सामूहिक स्वरात घनघन माला नभी दाटल्या हे गीत सादर केले. येरे येरे पावसा तुला देतो पैसा या बालगीताने पावसाला विनविले तर सरी आल्या ग गीतातून रसिकांना चिंब केले.
संचालन व प्रास्ताविक संध्या देशमुख यांनी केले. अतिथींचा परिचय युवा कार्यकर्ता ज्ञानेश्वर येवतकर यांनी केला. स्वागत प्रभाकर उघडे व विलास ढुमणे यांनी केले. आभार प्रभाकर उघडे यांनी मानले. मैफलीला विलास ढुमणे, भारतभूषण मेहता, जोत्सना ढुमणे, मैथिली खटी, ज्योती गाठीबांधे, शांता पावडे, पुष्पमाला देशमुख, ज्ञानेश्वर येवतकर, अमन चौहान, शेखर देशमुख आदींनी सहकार्य केले. यावेळी २८ आॅगस्टला होणारा आनंदी कट्टाचा कार्यक्रम श्रावण या विषयावर आधारित राहणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: A joyous concert dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.