पोलीस अधीक्षक कार्यालयावर पत्रकारांचा निषेध मोर्चा

By Admin | Updated: March 11, 2017 00:42 IST2017-03-11T00:42:30+5:302017-03-11T00:42:30+5:30

पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांकरिता ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने बजाज चौकातून

Journalists' Prohibition Morcha on the Superintendent of Police | पोलीस अधीक्षक कार्यालयावर पत्रकारांचा निषेध मोर्चा

पोलीस अधीक्षक कार्यालयावर पत्रकारांचा निषेध मोर्चा

एसपींना विविध मागण्यांचे निवेदन
वर्धा : पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांकरिता ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने बजाज चौकातून शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
हा मोर्चा मुख्य मार्गाने बढे चौक येथून इतवारा चौक मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. मोर्चात ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्याध्यक्षा चंदा सिरसाट यांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष मंगेश चोरे, जिल्हा संघटक दिलीप भुजाडे, म.रा.म.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अजीज शेख, सर्वोदय गोशाळाचे अध्यक्ष वसंत पंचभाई यांचा समावेश होता. होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Journalists' Prohibition Morcha on the Superintendent of Police