जीपला अपघात; १५ जखमी
By Admin | Updated: March 22, 2015 01:50 IST2015-03-22T01:50:28+5:302015-03-22T01:50:28+5:30
भोयर पवार मंडळातर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याकरिता निघालेल्या जीपला अपघात झाला. यात १५ जण जखमी झाले.

जीपला अपघात; १५ जखमी
कारंजा (घाडगे) : भोयर पवार मंडळातर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याकरिता निघालेल्या जीपला अपघात झाला. यात १५ जण जखमी झाले. ही घटना महामार्ग क्रमांक ६ वरील सावळी गावाजवळ शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची नावे मिराबाई कुहीटे, संगीता देवासे व रोशन कुहीके अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर १२ जणांवर येथील उपजिल्ह्यात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये सविता गोरे (३२) (सारवाडी), प्रभा देवासे (४०) (जुनापाणी), संगीता देवासे (३५) (सारवाडी), बबली कूहीके (२१) (खैरी), सुंदर देवासे (५०) (जुनापाणी), मनिषा चौधरी (१९) (खापरी), पुष्पा बन्नगरे (५०) (जुनापाणी), रूपाली खवशी (१०) (जुनापाणी), प्रिती चोपडे (२७) (चिखली), मिराबाई कुहीटे (५५) (खैरी), मंगला बारगे (४५) व ज्ञानेश्वर बारंगे (३०) यांचा समावेश आहे. भोयर पवार समजामंडळाच्यावतीने येथील एका सभागृहात सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात सहभागी होण्याकरिता, जुनापाणी चौकी येथून वरात घेवून एक जीप निघाली. महामार्ग क्रमांक ६ वर सावळी गावाजवळ जीप अनियंत्रित हावून उलटली. यात जीपमधील चालकासह १४ प्रवासी जखमी झाले. यातील तिघांना नागपूरला पाठविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या चमुने जखमींवर तातडीचा उपचार केला. रवी खोपे या युवकाने जखमींना रुग्णालयात नेण्याकरिता सहकार्य केले.(तालुका/शहर प्रतिनिधी)