शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

जावईबापूंचा पहिला दसरा पाच हजारांत; सोने 48 हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

लॉकडाऊननंतर मार्केट पूर्वपदावर येताच सोन्याला मागणी वाढली आहे. गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सोने ४८ हजारांवर पोहोचले असून दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात दागिने खरेदीसाठी गर्दी उसळली असून दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव हा ५० हजारावर पोहोचण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. एकंदरीत सराफा बाजारात झळाळी असल्याचे चित्र आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसऱ्यानिमित्त झळाळी आली होती. ग्राहकांनी आवश्यक वस्तूंसह दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पहिल्या दसरा सणानिमित्त जावाईबापूंना सोन्याचे पान देण्याची परंपरा असून, यंदा पाच हजारांत सोन्याचे पान द्यावे लागणार आहे. ग्राहकांनी आवश्यक वस्तू आणि दागिन्यांची मोठ्याप्रमाणात खरेदी केली असून या दिवशी मुख्यत्वे सराफा, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्राॅनिक्स बाजारपेठेंमध्ये जवळपास कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. यावर्षी बाजारात ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह होता. लॉकडाऊननंतर मार्केट पूर्वपदावर येताच सोन्याला मागणी वाढली आहे. गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सोने ४८ हजारांवर पोहोचले असून दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात दागिने खरेदीसाठी गर्दी उसळली असून दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव हा ५० हजारावर पोहोचण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. एकंदरीत सराफा बाजारात झळाळी असल्याचे चित्र आहे. सध्या इलेक्ट्राॅनिक मार्केटमध्येही कमालीची गर्दी पहावयास मिळत असून सण उत्सवळ काळात इलेक्ट्रीक साहित्य खरेदीलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सोने बाजारात धूमदसऱ्यानिमित्त सराफा बाजारात गर्दी उसळल्याने सराफा बाजाराला झळाळी आली आहे. अनेकांनी लग्नसराईनिमित्त दागिन्यांची बुकिंग देखील केल्याची माहिती सराफा व्यावसायिकाने दिली आहे. दिवाळीपर्यंत आणखी बाजाराला झळाळी येणार असून सोनं खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळत आहे.

अर्ध्या ग्रॅमचे पान २७००, तर एक ग्रॅमचे ५ हजारात पहिल्या दसऱ्याला जावईबापूला सोन्याचे पान देण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी उसळली आहे. अर्ध्या ग्रॅम सोन्याचे पान २ हजार ७०० रुपयांपर्यंत, तर एक ग्रॅमच्या सोन्याच्या पानाची किंमत ५ हजार १०० पर्यंत गेली असल्याने यंदा जावईबापूचा दसरा पाच हजारांत जाणार आहे.

महिनाभरात २००० रुपयांनी वाढले भाव -  कोरोनामुळे सराफा व्यवसायावर मंदीचे सावट निर्माण झाले होते. मात्र, अनलॉक होताच बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर आली आहे. -  ३० सप्टेंबर रोजी सोन्याचा दर ४६ हजारांवर होता. मात्र, अवघ्या १४ दिवसांतच हा दर तब्बल ४८ हजारांवर गेला असून, या १४ दिवसांत २ हजार रुपयांनी सोन्याचे भाव वाढले असून येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव ५० हजारी गाठण्याची शक्यता आहे.

सराफा बाजाराला झळाळी...दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात चांगलीच झळाळी आलेली आहे. अनेकांनी लग्नसराईनिमित्ताने आतापासूनच दागिन्यांचे बुकिंगही केलेले आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ५० हजारावर जाण्याची शक्यता असून सोनं खरेदीसाठी महिलावर्गांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.- सौरभ ढोमणे,  सराफा व्यावसायिक वर्धा.

 

टॅग्स :Goldसोनं