२१० गावांत राबविणार जलयुक्त शिवार अभियान

By Admin | Updated: February 17, 2016 01:48 IST2016-02-17T01:48:14+5:302016-02-17T01:48:14+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड करताना माथा ते पायथा या प्रणालीनुसार पाणलोट विकासाची कामे घेण्याला

Jalakit Shivar campaign will be implemented in 210 villages | २१० गावांत राबविणार जलयुक्त शिवार अभियान

२१० गावांत राबविणार जलयुक्त शिवार अभियान

वर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड करताना माथा ते पायथा या प्रणालीनुसार पाणलोट विकासाची कामे घेण्याला प्राधान्य देण्यात आले. यावर्षी याच तत्वानुसार २१० गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावात शिवार फेरी घेवून पाण्याच्या ताळेबंदाबाबत गावकऱ्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिणा, अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जलतज्ज्ञ सोमनाथे, तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील गावात राबविण्यात येत असलेल्या गावांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असून त्यावर चर्चा झाली.

ग्रामसभेच्या ठरावानंतरच जलयुक्तची देयके देण्याच्या सूचना
४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत वर्षी कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यासाठी ४६ कोटी ९९ हजार रुपयांच्या निधीपैकी ३५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विविध विभागातर्फे पूर्ण झालेल्या कामासंदर्भातील देयकांच्या मंजुरीपूर्वी ग्रामसभेच्या ठराव जोडणे आवश्यक आहे. ज्या देयकांसोबत ग्रामसभेचा ठराव आहे. अशी देयके तत्काळ मंजूर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या आहेत.
४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या कामाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी सलील यांनी अपूर्ण कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना केल्या. पूर्ण झालेल्या कामासंदर्भातील देयके तात्काळ सादर करावीत. जिल्ह्यातील विविध यंत्रणांच्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट करण्यात आले असून आठ कामे प्रगतीपथावर आहेत. जलसंधारण विभागातर्फे ७८ कामांपैकी ६१ कामे प्रगतिपथावर आहेत. काही कामे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. कृषी विभागातर्फे ५३९ कामांपैकी ३८४ कामे पूर्ण झाली असून ११० कामे प्रगतिपथावर आहेत. ४५ कामांना लवकरच सुरूवात होत आहे. ही सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. अशा सूचना देण्यात आल्या. अपूर्ण असलेल्या व या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी कामे घेताना नाला खोलीकरण सिमेंट बांध तसेच शेततळ्यांची कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना यावेळी दिल्यात. प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांनी अभियानाअंतर्गत सर्व कामांची यंत्रणानिहाय माहिती दिली.

Web Title: Jalakit Shivar campaign will be implemented in 210 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.