शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहाची क्षमता २५२, प्रत्यक्षात पाचशेवर बंदिवान; त्यातच आले तीन 'इंटरनॅशनल' कैदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:01 IST

Wardha : गृहविभागाने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असून, गांधी जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख सर्वदूर आहे. अशा अहिंसेच्या जिल्ह्यात हिंसक घटना सातत्याने वाढत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशातच मंजूर ६६ पदांपैकी १९ पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. 

गुन्हेगारांना ठेवण्याची कारागृहात पुरेशी व्यवस्था नाही. त्यातच कोल्हापूर कारागृहातून वर्धा कारागृहात आलेल्या तीन 'इंटरनॅशनल' बंदिवानांची भर पडली असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्याऱ्यांची झोपच उडाली आहे. डोळ्यांत तेल घालून त्यांना कर्तव्य बजावावे लागत आहे. 

वर्धा जिल्हा कारागृह है वर्ग-१चे कारागृह आहे. कारागृहात महिला व पुरुष पकडून २५२ बंदिवानांची क्षमता आहे. असे असतानाही कारागृहात दुपटीपेक्षा अधिक जवळपास ४०० वर बंदिवानांना कोंबून ठेवण्याची स्थिती असल्याने कारागृह की कोंडवाडा, असा प्रश्न उपस्थित होतो. मंजूर संख्येपेक्षा निम्म्या मनुष्यबळावर कारागृहातील सुरक्षेचा भार असल्याने बंदिवानांच्या सुरक्षा ही चिंतेची बाब ठरत आहे. 

जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखांवर असून, अशातच गुन्हेगारीचा वाढत असलेला आलेख, गुन्हे प्रकटीकरण आणि अटकेतील गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होत असल्याने कारागृह नेहमीच गजबजलेले असते. कारागृहात 'मोक्का'चे ११ गुन्हेगार, एमपीडीएवे सहा गुन्हेगार असून यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, सांगली येथील कारागृहातून वध्र्याच्या कारागृहात वर्ग करण्यात आलेले गुन्हेगार आहेत, तीन आंतरराष्ट्रीय बंदी, गैंगस्टरांचा यात समावेश असल्याने कारागृह 'अलर्ट मोड'वर आहे. कारागृहात नित्याने सकाळी आणि सायंकाळी वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांकडून राऊंड होता तसेच सर्च ऑपरेशनही राबविले जाते.

५० कॅमेऱ्यांच्या निगराणीत नऊ बॅरेक... कारागृहात मंजूर पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यातच कारागृहाची क्षमता २५२ असताना विविध गुन्ह्यांतील ५००वर बंदिवान आहेत. व्यवस्थेवर ताण येऊ नये, याअ नुषंगाने ५० सीसीटीव्ही कैमेयाची नजर आहे. कारागृ हातील संपूर्ण बॅरेक कैमेप्याध्या निगराणीत असते. बंदिवानांची सुरक्षा आणि त्यांना सोयीसुविधा पुरविताना कार्यरत मनुष्यबळाची मोठी दमछाक होते. रिक्त पदे भरण्याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून पाठपुरा वादेखील केला जात आहे. मात्र, अद्याप कुठल्याही हालचाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे गृहविभागाने याकडे लक्ष देत तत्काळ रिक्त पदे भरण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा