वर्धा कला महोत्सवात रक्तदानाचा जागर
By Admin | Updated: December 27, 2015 02:30 IST2015-12-27T02:30:26+5:302015-12-27T02:30:26+5:30
वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला महोत्सवात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने ...

वर्धा कला महोत्सवात रक्तदानाचा जागर
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे आयोजन : सलग नवव्या वर्षी राबविला उपक्रम
वर्धा : वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला महोत्सवात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन लोक विद्यालयातील प्रांगणात करण्यात आलेले होते. संघटनेच्या संयोजनात सलग नवव्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर रक्तदान शिबिर रक्त संक्रमण अधिकारी डॉ. चकोर रोकडे, रक्तपेढी तंत्रज्ञ मो. सईद, जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे व सामान्य रुग्णालय वर्धेतील चमूच्या सहभागाने घेण्यात आले. शिक्षकांनी व कला महोत्सवातील सदस्यांनी यावेळी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन संताजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव नीळकंठ पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच सतीश इखार तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य सचिव सतीश बजाईत, श्याम लोडे, एस. एस. दांडेकर, लोमेश वऱ्हाडे, नलिनी चिचाटे, प्रा. सचिन सावरकर, संदीप चिचाटे, मनीष जगताप, दिलीप धामंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश बजाईत यांनी केले. संचालन निवृत्ती शेळके यांनी केले तर आभार प्रमोद काळबांडे यांनी मानले.
आयोजनाकरिता छत्रपती फाटे श्रीधर घोडमारे, अविनाश कलोडे, मधुकर बावने, गजानन राऊत, हेमंत जुनघरे, अनिल शंभरकर, संजय नंदनवार, भिमा आत्राम, यशवंत उमक, संजय चौधरी, देशमुख, अनिल खंगार, राजा मन्ने, प्रदीप आंबटकर, मीना बोकडे, शीतल सावरकर, चैतन्य वरघणे, अनुपरीक्षित शेळके, संजय भुरे, आशिष फरकाडे, सुनील दारव्हनकर, सुभाष गोल्हर, संजना किनगावकर, संध्या रायपुरे, नीलिमा शेळके आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)