माणसाने माणसाशी भेदभाव करणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:08+5:30

नयी तालिम समिती परिसरातील शांती भवनात आयोजित राष्ट्रीय युवा संघटनच्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते. गोठूळ शिक्षणप्रणाली ही आनंददायी शिक्षण देणारी आहे. यात धार्मिक, सामाजिक व युवा अशा तीनस्तरावर शिक्षण देऊन कार्य केले जाते. गावातील कार्यपद्धती ही सामूहिक असून निर्णय सहमतीने घेतले जातात. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही मानवी समूह पद्धती केंद्रित आहे.

It is wrong for a man to discriminate against a man | माणसाने माणसाशी भेदभाव करणे चुकीचे

माणसाने माणसाशी भेदभाव करणे चुकीचे

ठळक मुद्देदेवाजी तोफा : राष्ट्रीय युवा संघटनचे राज्यस्तरीय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : स्वातंत्र्य, समता व बंधुता अशी ओळख असणारे गाव म्हणजे लेखामेंढा या गावाने दिल्ली, मुंबईला आमचे सरकार आमच्या गावात, आम्हीच सरकार, असा नारा बुलंद केला. गांधीजींनी मांडलेली ग्रामस्वराज्याची संकल्पना आणि विनोबांनी राबविलेली भूदान चळवळ ही खूपकाही शिकवून गेली. गावातच नव्हे, तर देशात कार्य करायचे असेल तर माणसाने माणसाशी भेदभाव न करता वागले पाहिजे. माणसा-माणसातील भेदभाव चुकीचा आहे, असे लेखामेंढाचे देवाजी तोफा यांनी सांगितले.
नयी तालिम समिती परिसरातील शांती भवनात आयोजित राष्ट्रीय युवा संघटनच्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते. गोठूळ शिक्षणप्रणाली ही आनंददायी शिक्षण देणारी आहे. यात धार्मिक, सामाजिक व युवा अशा तीनस्तरावर शिक्षण देऊन कार्य केले जाते.
गावातील कार्यपद्धती ही सामूहिक असून निर्णय सहमतीने घेतले जातात. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही मानवी समूह पद्धती केंद्रित आहे. ग्रामदान कायदा १९६४ ला अस्तित्वात आला. एकात एक अनेकात एक ही भावना अधिक प्रभाविपणे अमलात आणल्या गेल्याने गावात एकनिष्ठतेचे मूल्य रूजले. यामुळे लेखामेंढाची ओळख देशात निर्माण झाल्याचे देवाजी तोफा यांनी यावेळी स्पष्ट केले. देवाजी तोफा यांच्याशी डॉ. उल्हास जाजू यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विषयाची मांडणी केल्याने शिबिरार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता आला. राज्यातील २० जिल्ह्यातील १५० शिबिरार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत. शिबिराचे संयोजक मनोज ठाकरे असून राज्य संयोजक डॉ. ज्ञानेश वाघमारे यांचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: It is wrong for a man to discriminate against a man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.