शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाची विश्वसनियता अबाधित राखणे ही जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:03 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर शुक्रवारी पत्रकार परिषद घेत टीका केली. या घटनेमुळे सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा डागाळली. देशात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळच माजली आहे.

ठळक मुद्देविधीवर्तुळात खळबळ : न्यायाधीशांची पत्रपरिषद योग्य की अयोग्यवरच होतेय मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर शुक्रवारी पत्रकार परिषद घेत टीका केली. या घटनेमुळे सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा डागाळली. देशात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळच माजली आहे. सर्वोच्च न्यायालयही विश्वासास पात्र नाही काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. वास्तविक, न्यायालयांची विश्वसनियता जपणे, हे न्यायाधीश, वकील तथा न्याय प्रणालीतील सर्व अधिकारी, कर्मचाºयांची जबाबदारी असते; पण दस्तुरखुद्द विद्यमान न्यायाधीशांनीच पत्रपरिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांच्यावर आरोप केल्याने या विश्वासाला कुठेतरी तडा गेल्याचेच दिसून येत आहे.यावर मान्यवर वकिलांकडून जाणून घेतले असता त्यांनीही ही घटना अप्रिय असल्याचेच मत व्यक्त केले. शिवाय न्यायाधीशांनी आपसात चर्चा करून पाऊल उचलणे गरजेचे होते, असा सूरही उमटला. काही मान्यवर वकिलांच्या या प्रतिक्रीया...न्यायपालिकेचा प्रश्न आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ही बाब लक्षात घेतली तर हा मुद्दा पत्रपरिषदेच्या माध्यमातून न मांडता त्यासाठी नियमात दिलेल्या अन्य पर्यायांचा अवलंब करायला हवा होता. पत्रपरिषदेमुळे ही बाब जनतेपूढे आली; पण त्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य न्यायपालिकेकडे ज्या विश्वासाने व आशेने पाहतात, त्याला कुठेतरी तडा जाईल. पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना याबाबत प्रतिक्रीया मागविल्या आहेत. हा प्रघात पडला तर ते कुठेतरी घातकच ठरेल. यामुळे आजची घटना टाळता आली असती. आपसात चर्चा करून न्यायाधीशांना तो मुद्दा सोडविता आला असता.- अ‍ॅड. श्याम दुबे, माजी शासकीय अभियोक्ता, वर्धा.सदर प्रकरण आपसात चर्चा करूनही मिटविता आले असते, पत्रकारांपुढे मांडायला नको होते. देशासमोर ही बाब उघड झाल्याने न्यायपालिकेच्या प्रतिमेला कुठेतरी तडा गेला आहे. शिवाय हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित असल्याने त्यांच्यापेक्षा वरिष्ठ यंत्रणा दुसरी कोणतीच नाही. लोकांपुढेही आता न्याय कुणाला मागावा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.- अ‍ॅड. रवींद्र गुरू, ज्येष्ठ विधीज्ञ, वर्धा.आपल्या पदाची जबाबदारी आणि भान ठेवून काम केले तर ते समाजासाठी पोषक असेल. याचा विसर पडल्याने आजची पत्रकार परिषद घडून आली आहे. उच्च पदावर काम करताना प्रगल्भता असायलाच हवी. कारण, ही बाब समाज मनावर परिणाम करणारी आहे. न्यायपालिकेबद्दल समाजात जो आदर आहे, तो कुठेतरी कमी होऊ शकतो. यामुळे न्यायपालिकेने आपल्या जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. अनुराधा सबाने, माजी शासकीय अभियोक्ता, वर्धा.४० वर्षांपूर्वी असा प्रघात होता की, न्यायाधीश एक दिवस विलंबाने वृत्तपत्र वाचत होते. कारण, लोकसमस्यांची जाण ठेवताना कोणतं माध्यम निवडावं, त्याचेही काही नियम असतात. आता काळ बदलला आहे. देश बरोबर चालत नाही म्हणून याप्रमाणे पत्रपरिषद घेऊन ही बाब संपूर्ण देशासमोर मांडणे तसे पाहिले तर अयोग्य म्हणता येईल. न्यायपालिकेची प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचा हा प्रकार आहे. न्यायव्यवस्था आणि समाज यांच्याकरिता ही बाब चांगली नाही. एकंदरच या प्रकारामुळे समाज मन ढवळून निघाले आहे. घटनेने घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, स्वातंत्र्याचा अतिरेक होता कामा नये, याची जबाबदारी त्यांची आहे.- डॉ. अशोक पावडे, माजी अधिष्ठाता, विधी विभाग, नागपूर विद्यापीठ.न्यायाधीशांनी याप्रमाणे पत्रपरिषद घेऊन प्रतिक्रिया द्यावी अथवा नको किंवा आपली भूमिका कुणासमोर मांडावी, याबद्दल कोणतेच नियम नाहीत. एखाद्या पत्रपरिषदेने न्यायप्रणालीची प्रतिमा किंवा विश्वास कमी होईल, असे म्हणणे चुकीचे आहे. किंवा न्यायप्रणालीपुढे या प्रकरणाने कुठल्या समस्या निर्माण झाल्या, असेही नाही. कारण, ही व्यवस्था तिच्या मुल्यांवर आधारित आहे. व्यक्तिश: तिला कुणी चव्हाट्यावर आणू पाहत असेल तर ते चुकीचे आहे. न्यायपालिकेला कुठला धोका आहे, असे म्हणता येणार नाही; पण आजचे प्रकरण याप्रकारे सर्वांपूढे न ठेवता ते अंतर्गत सोडवायला हवे होते, असे वाटते.- अ‍ॅड. अजीत सदावर्ते, ज्येष्ठ विधीज्ञ, वर्धा.