चुकीची माहिती देत सदस्यांचीच दिशाभूल
By Admin | Updated: March 16, 2015 01:39 IST2015-03-16T01:39:39+5:302015-03-16T01:39:39+5:30
पंचायत समितीच्या मासिक सभेत विचारलेल्या प्रश्नांवर चुकीची माहिती देत सदस्यांचीच दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे़ ..

चुकीची माहिती देत सदस्यांचीच दिशाभूल
सेलू : पंचायत समितीच्या मासिक सभेत विचारलेल्या प्रश्नांवर चुकीची माहिती देत सदस्यांचीच दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे़ ठरावाची अंमलबजावणी न करता चुकीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप पं़स़ सदस्य रजनी तेलरांधे यांनी केला आहे.
२३ जुलै २०१३ रोजी घोराड तिर्थक्षेत्रालगत बोरतिरावर घाट बांधण्याचा ठराव मासिक सभेत घेण्यात आला होात़ हा ठराव जिल्हा नियोजन समितीला पाठविण्यात आला काय, असा प्रश्न विचारण्यात आला़ यावर विस्तार अधिकाऱ्याने दिलेल्या अनुपालनात पंचायत समिती सोडून ग्रा़पं़ ने ठराव पाठविला, असे नमूद केले़ यामुळे मासिक सभेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. मोही येथे रोडवरील सार्वजनिक शौचालय बंद असून ते सुरू करण्यासाठी लागणाऱ्या निधीची पुर्तता करावी, असा प्रश्न आहे़ यावर नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले; पण तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही याची अंमलबजावणी का होत नाही, हे अनुत्तरीतच आहे़ मासिक सभेत मांडलेले प्रश्न तेव्हाच ठराव बुकावर घेऊन त्याची उत्तरे द्यावी, असा विषय मांडला़ यावर मासिक सभेत मंजुरी मिळाल्यानंतरच कार्यव्रत रजिस्टर लिहिता येते, असे सांगितले जाते; मासिक सभा कशासाठी, हा प्रश्नच आहे़ पं़स़ सदस्यांनी मागितलेली चौकशी महिनाभऱ्यानंतरही होत नाही़
गुडमॉर्निंग पथकाच्या मागणीला वाटण्याच्या अक्षदा लावल्याचा आरोप तेलरांधे यांनी केला आहे़ १२ सदस्यांच्या सभागृहात सर्व सदस्य हजर असताना सभा तहकुब करण्यात आली, हे विशेष़ या प्रकाराची चौकशी करीत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तेलरांधे यांनी केली आहे़(शहर प्रतिनिधी)