वेगळ्या विदर्भाचा मुद्दा राजकीय करणे गरजेचे

By Admin | Updated: March 1, 2016 01:37 IST2016-03-01T01:37:14+5:302016-03-01T01:37:14+5:30

विदर्भातील सर्वसामान्य नागरिकांना भाजप वेगळा विदर्भ देईल, असे वाटत होते; पण त्यांच्याकडून असलेली आशा आता निराशेत बदलत आहे.

The issue of a separate Vidarbha should be made political | वेगळ्या विदर्भाचा मुद्दा राजकीय करणे गरजेचे

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा राजकीय करणे गरजेचे

राजकुमार तिरपुडे : पत्रपरिषद, न.प. च्या निवडणुकीपासून प्रारंभ
वर्धा : विदर्भातील सर्वसामान्य नागरिकांना भाजप वेगळा विदर्भ देईल, असे वाटत होते; पण त्यांच्याकडून असलेली आशा आता निराशेत बदलत आहे. यामुळे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा राजकीय करणे गरजेचे झाले आहे. यामुळेच विदर्भ माझा हा पक्ष तयार करून पालिकांच्या येत्या निवडणुकीत विदर्भात सर्वच पालिकेतील जागा लढविणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष राजकुमूार तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेगळ्या विदर्भाकरिता सुरू असलेल्या लढ्यात पहिलेपासून सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसमध्ये असताना वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शिवाय राष्ट्रवादी काँगेस वेगळ्या विदर्भाच्या विरोधात आहे. शिवसेना व मनसे तर विदर्भाचे कडवे विरोधक आहेत. यामुळे वगेळ्या विदर्भाचा मुद्दा राजकीय करण्याची गरज निर्माण झाली होती. याकरिता नवीन पक्ष स्थापन करण्यात आला आहे. यातून नागरिकांना विदर्भाकरिता जागृत करण्याचे काम करण्यात येणार आहे. विदर्भाच्या विकासाकरिता ‘विदर्भ माझा’ची योजना तयार आहे.
या कामाकरिता काही राजकीय पक्ष आपल्या सोबत आहेत. शिवाय या संदर्भात विदर्भ विकास परिषदेचे संस्थापक दत्ता मेघे यांच्याशीही त्यांची चर्चा झाली असून त्यांनी पक्षात राहून दबाव तंत्राच्या माध्यमातून वेगळा विदर्भ घेण्याची भूमिका मांडली. आपण हा नवा पक्ष स्थापन केल्याची माहिती तिरपुडे यांनी वर्धेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत मंगेश तेलंग तसेच गोंडवाना गणतमंत्र पार्टीचे मडावी, मधुकर उईके, इंद्रजीत आमगावकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: The issue of a separate Vidarbha should be made political

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.