आयपीएल क्रिकेट बेटींगवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:07 IST2018-05-08T00:07:16+5:302018-05-08T00:07:25+5:30
येथील न्यू यशवंत नगरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवही केली. यात चार जणांवर जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आयपीएल क्रिकेट बेटींगवर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील न्यू यशवंत नगरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवही केली. यात चार जणांवर जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी लक्ष्मण सखावतराय मोटवाणी, राहुल अशोक चंगलाणी, राजेश नेवदराम मोटवाणी, महेंद्र उर्फ गुड्डूराम सखावतराय मोटवाणी या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे चारही जण लक्ष्मण मोटवाणी याच्या घरी आयपीएल क्रिकेट मालिकेतील मुंबई इंडियन विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणाऱ्या सामन्यावर सट्टा खेळत होते.
या कारवाईत पोलिसांनी एक टिव्ही, एक सेटटॉप बॉक्स, एक रिमोट, चार मोबाईल, एका मोबाईलमध्ये आकडे लिहिलेला कागदाचा फोटा व रेकॉर्डींग होते, एक टिव्ही टेबल, चार खुर्च्या, एक कंपनी, एमएच ३२ एल ०३९३ क्रमांकाची दुचाकी व रोख ८ हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवही एस. यांच्या मार्गदर्शनात, उप विभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, अशोक साबळे, राजेंद्र ठाकूर, दिनेश कांबळे, हरिदास काकड यांनी केली.