वर्धेत आयपीएलवर सट्टा

By Admin | Updated: April 24, 2015 23:55 IST2015-04-24T23:55:54+5:302015-04-24T23:55:54+5:30

सध्या आयपीएलचा ज्वर जोर धरत आहे. यात गुरुवारी रात्री सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली डेअरडेव्हील्स या दोन संघातील...

IPL betting on Waver's | वर्धेत आयपीएलवर सट्टा

वर्धेत आयपीएलवर सट्टा

एकास अटक; एक फरार : सिव्हील लाईन परिसरात कारवाई
वर्धा : सध्या आयपीएलचा ज्वर जोर धरत आहे. यात गुरुवारी रात्री सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली डेअरडेव्हील्स या दोन संघातील सामन्यावर सिव्हील लाईन्स परिसरात सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी कारवाई केली. यात एकाला अटक करण्यात आली तर एक फरार झाला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७५ हजार ३१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्याचे नाव सुभाष जैन तर फारार झालेल्याचे नाव अंकुर जैन असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुभाष जैन व त्यांचा मुलगा अंकुर हे दोघे मिळून त्याच्या घरी या सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली डेअरडेव्हील्स या सामन्यावर पैशाची बाजी लावत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेड केला असता अंकुर जैन हा मौक्यावरून फरार झाला. त्याच्या घर झडतीमध्ये वरच्या माळ्यावर दोन टिव्ही संच (एलईडी), दोन टिव्ही रिमोट, एक लॅपटॉप, एक पेनड्राईव्ह, दोन एक्सटेंशन बोर्ड, दोन मोबाईल हॅन्डसेट, तीन मोबाईल चार्जर, एक लॅन्डलाईन फोन, एक क्लिप बोर्ड, एक पेन, एक बजाज कपंनीचा कुलर, एक डिव्हीआर मशिन, लगवाडीचे आकडे लिहून असलेला कागद व रोख ७ हजार ९०० रुपये, असा एकूण ७५ हजार ३१५ रुपयांचा माल जप्त केला. यात सुभाष जैन याला अटक करण्यात आली. या दोघांविरूद्ध शहर ठाण्यात मुंबई जुगार कायद्याच्या कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई एसपी अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश चाटे व पोलीस कर्मचारी उदसिंग बारवाल, अशोक वाट, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, समीर कडके, संजय गायकवाड, किशोर अप्तुलकर, संजय देवरकर, विलास बालपांडे, संचाली मुंगुले, शिल्पा राऊत, अजय वानखेडे, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, अनुप कावळे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: IPL betting on Waver's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.