आयपीएलवर सट्टा; दोघांना अटक

By Admin | Updated: May 23, 2016 02:09 IST2016-05-23T02:09:29+5:302016-05-23T02:09:29+5:30

येथील बसस्थानक परिसरातील एका लॉजवर आयपीएल क्रिकेट मॅचचा आॅनलाईन जुगार खेळत असताना दोन युवकांना शनिवारी रात्री पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

IPL betting; Both arrested | आयपीएलवर सट्टा; दोघांना अटक

आयपीएलवर सट्टा; दोघांना अटक

४१ हजारांचा मुद्देमाल
हिंगणघाट : येथील बसस्थानक परिसरातील एका लॉजवर आयपीएल क्रिकेट मॅचचा आॅनलाईन जुगार खेळत असताना दोन युवकांना शनिवारी रात्री पोलिसांनी रंगेहाथ पकडले. राजकुमार मोटुमल बजाज (२६) व हरिष चंदाणी (२६) रा. गुरुनानक वॉर्ड अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून ४१ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंगणघाट येथील परिक्षाविधीन ठाणेदार निलोत्पल यांनी मिळालेल्या माहितीवरून या लॉजवर धाड टाकली. लॉजमधील १०३ क्रमांकाच्या खोलीत राजकुमार मोटुमल बजाज व हरिष चंदाणी हे दोघेही आयपीएलच्या सुरू असलेल्या गुजरात विरुद्ध मुंबई या सामन्यावर सट्टा लावित असताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. ही कारवाई निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोरखेडे, लिंगाडे, अरविंद येणुरकर, निरंजन वरभे, राजू हाडके, ऋषिकेश घंगारे, प्रफुल्ल हेडाऊ यांनी केली. या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: IPL betting; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.