वृक्षसंगोपन गैरव्यवहाराची चौकशी करा
By Admin | Updated: November 9, 2014 23:18 IST2014-11-09T23:18:39+5:302014-11-09T23:18:39+5:30
तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत वृक्षसंगोपनाच्या कार्यक्रमातील कथीत गैरव्यवहाराची व ग्रामपंचायत च्या पाच वर्षाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

वृक्षसंगोपन गैरव्यवहाराची चौकशी करा
हिंगणघाट : तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत वृक्षसंगोपनाच्या कार्यक्रमातील कथीत गैरव्यवहाराची व ग्रामपंचायत च्या पाच वर्षाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे हिंगणघाट येथील गटविकास अधिकारी आणि वरिष्ठांना केली आहे.
शासनाच्या एम. आर. ए. जी. एस. योजनेंतर्गत वृक्षारोपनाच्या कार्यातील मजुरांना काही महिण्यांपासून मजुरी दिली नाही. परंतु त्यांचे वेतन मात्र पगार पत्रकात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर ग्राम पंचायत चा रेकार्ड सचिवाने घरी ठेवणे, संगणक व झेराक्स मशीनही सचिवाने घरी ठेवणे, सामान्य खंडाचा हिशोब मासिक सभेत न ठेवता परस्पर करणे, मागासवर्गीयासाठीच्या १५ टक्के खर्चाची माहिती सदस्यांपासून लपविणे, सदस्यांना मिटिंग भत्ता न देणे तसेच सचिवाने मुख्यालयी न राहणे आदी आरोप करून या सर्व बाबीची चौकशी करून सचिवावर कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मनरेगा अंतर्गत ६ कर्मचाऱ्यांनी देखील सप्टेंबर २०१३ पासून कामाची मजुरी मिळाली नसल्याचे निवेदन गटविकास अधिकारी हिंगणघाट यांना दिले असून त्वरीत पूर्ण मजूरी देण्याची मागणी केली आहे.(शहर प्रतिनिधी)