अपंगांचे अखंड आरती आंदोलन

By Admin | Updated: February 25, 2016 01:56 IST2016-02-25T01:56:12+5:302016-02-25T01:56:12+5:30

प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने अखंड आरती आंदोलन करण्यात आले.

Integrated Aarti Movement of Disabled | अपंगांचे अखंड आरती आंदोलन

अपंगांचे अखंड आरती आंदोलन

पालिकेद्वारे मागण्यांची पूर्तता : शासन आदेशानुसार अपंगांना पेन्शन
देवळी : प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने अखंड आरती आंदोलन करण्यात आले. न.प. कार्यालयासमोर ठिय्या मांडून २८ आॅक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे न.प. च्या उत्पन्नातील ३ टक्क्यांचा राखीव निधी अपंगांसाठी खर्च करावा, या टक्केवारीनुसार दरवर्षी ६ लाखांच्या तरतुदीतून अपंगांना प्रती व्यक्ती ५०० रुपये पेन्शन लागू करावी, आश्वासनांची पूर्तता करावी, आदी मागण्या रेटण्यात आल्या.
शासनाच्या अध्यादेशानुसार न.प. ला मालमत्ता करातून मिळणाऱ्या निधीतून हा पैसा पेन्शनच्या माध्यमातून देण्याचे न.प.द्वारे ठरविण्यात आले; पण हा आकडा आंदोलनकर्त्यांना मान्य न झाल्याने बुधवारी दिवसभर आरती आंदोलन सुरू होते. पुन्हा झालेल्या बोलणीनुसार न.प.च्या उत्पन्नातील २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांत प्रत्येकी ३ टक्के प्रमाणे ६ लाखांचा निधी देण्याचे मान्य केले. अपंगांना देण्यात येणाऱ्या निधीतून शहरातील १२५ लाभार्थ्यांना मासिक पेन्शन लागू करण्याची सहमती पालिकेने दर्शविली. यासाठी सर्वसाधारण सभा बोलवून तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख, अध्यक्ष शोभा तडस, माजी उपाध्यक्ष राजेश बकाने, न.प. सदस्य कृष्णकांत शेंडे, माला लाडेकर यांनी तोडगा काढण्यात पुढाकार घेतला. आंदोलनात हनुमंत झोटींग, प्रमोद कुऱ्हटकर, प्रवीण फटींग, शैलेश सहारे, छाया देशपांडे, जयश्री कोरडे, सुनील मिश्रासह अपंग कार्यकर्ते सहभागी झाले.(प्रतिनिधी)

Web Title: Integrated Aarti Movement of Disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.