विमा सुरक्षा खाते नोंदणी अभियान
By Admin | Updated: November 29, 2014 23:25 IST2014-11-29T23:25:36+5:302014-11-29T23:25:36+5:30
स्थानिक श्री समर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आष्टी परिसरात विमा सुरक्षा खाते नोंदणी सप्ताह उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यात जागृती

विमा सुरक्षा खाते नोंदणी अभियान
आष्टी (श.) : स्थानिक श्री समर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आष्टी परिसरात विमा सुरक्षा खाते नोंदणी सप्ताह उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यात जागृती करुन ३७७ खात्यांची नोंदणी करण्यात आली.
शासकीय उपक्रम असलेल्या विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आयआरडीए अंतर्गत विमा सुरक्षा प्रणाली म्हणजे काय याही माहिती ग्राहकांना देण्यात आली. विमा पॉलिसींची माहिती सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध करुन देणे, कागद व वेळेची बचत करणे म्हणजेच ई- इंशुरींग अकाऊंटींग आहे. या प्रणाली अंतर्गत सर्व प्रकारच्या विमा पॉलिसीचे एकत्रीतपणे ईलेक्ट्रॉनिक रूपांतर करुन यात ग्राहकांची संपूर्ण केवायसी माहिती रूपात सुरक्षित व संग्रहित करण्यात येणार आहे. सर्व विमा खाते नोंदणी, लॉगीन आयडी व पासवर्ड देण्यात आला. तसेच संपूर्ण विमा पॉलिसींची माहिती इंटरनेट व मोबाईलवर आॅनलाईन पाहता येते. याची संपूर्ण माहिती रासेयो स्वयंसेवकांनी तालुक्यातील नागरिकांना समजावून सांगितली. या सप्ताहाअंतर्गत ३७७ विमा सुरक्षा खात्यांची नोंदणी करण्यात आली. नोंदणीला आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले.
या उपक्रमाकरिता प्राचार्य डॉ. हेमंत खानझोडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत जाधव व स्वयंसेवकांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थांचे नोंदणी अर्ज विभागाकडे सादर करण्यात आले.(प्रतिनिधी)