शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

बोंडअळीग्रस्त क्षेत्राची कृषी अधीक्षकांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:54 PM

बोंडअळीची भीषणता तपासण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी गणेश तिमांडे यांच्या कपाशीच्या शेताला सकाळी भेट दिली. लोकमतमध्ये प्रकाशित झालेली ‘कपाशीवर बोंडे अळीचा उद्रेक’ या बातमीची तातडीने दखल घेत नुकसानग्रस्त शेतीला भेट दिली.

ठळक मुद्देविद्या मानकर : लागोपाठ कपाशी घेऊ नका, प्रमाणित कामगंध सापळे वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : बोंडअळीची भीषणता तपासण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी गणेश तिमांडे यांच्या कपाशीच्या शेताला सकाळी भेट दिली. लोकमतमध्ये प्रकाशित झालेली ‘कपाशीवर बोंडे अळीचा उद्रेक’ या बातमीची तातडीने दखल घेत नुकसानग्रस्त शेतीला भेट दिली. या पीक पाहणी दरम्यान त्यांना तिमांडे यांच्या शेतात अनेक डोमकळ्या आढळून आल्या व प्रत्येक डोमकळीमध्ये गुलाबी बोंडअळी सुध्दा आढळून आली. हॅण्ड स्प्रेच्या १ लिटरच्या पंपामध्ये २ मि.मी. क्विनॉलफॉस हे औषध मिसळून प्रत्येक डोमकळीमध्ये ताबडतोड फवारण्याचा त्यांनी सल्ला दिला. एवढ्या मोठ्या क्षेत्रात डोमकळी शोधून फवारणी करणे मजुरीच्या दृष्टीने परवडणारे नाही, असा प्रतिप्रश्न सदर शेतकऱ्याने केला असता जर बोंडअळीचे निर्मूलन करावयाचे असेल तर हे करणे गरजेचे आहे, असे कृषी अधीक्षक म्हणाल्या असे केल्याने फुलात असलेली बोंड अळी तिथेच नष्ट होऊन पुढे निर्माण होणारी उपज थांबविता येईल, असेही त्या म्हणाल्या.शेतकरी कपाशीवर-कपाशी घेत असून पिकाची फेरपालट न केल्याने बोंडअळीचा उद्रेक वाढणार असून त्याला आवर घालणे कठीण होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. तिमांडे यांच्या शेतात कामगंध सापळेही लावलेले आढळले. शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोंड अळी असून सुध्दा कामगंध साफळ्यामध्ये एकही पतंग न आढळल्यामुळे कामगंध साफळ्यातील लूरच्या शुध्दतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सीआरसीआरने प्रमाणित केलेले कामगंध सापळे वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला.जिल्ह्यात २.५ लाख हेक्टरवर १.९७ लाख शेतकºयांनी कपाशीची लागवड केली असून कमी अधिक प्रमाणात कपाशीचे क्षेत्र बोंड अळीने बाधीत असून वेळीच उपाययोजना करावी लागणार आहे.कृषी विभाग-अधिकारी कितीही तातडीने दखल घेत असले तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालक करणे गरजेचे आहे.कृषी विभागामार्फत निंबोळी अर्क देणे शक्य नाहीएकात्मिक कीड व्यवस्थापन झाल्यास बोंडअळी नियंत्रणात येईल, अन्यथा यावर्षी गतवर्षीपेक्षाही मोठा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहे. निंबोळी अर्क फवारण्याचा सल्ला देण्यात येतो. पण प्रमाणीत निंबोळी अर्क मात्र कृषी विभाग उपलब्ध करून देत नाही. त्याबाबत विचारणा केली असता ते आमच्या अवाक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी डोमकळ्यामध्ये क्विनॉलफॉसची फवारणी करावी. उच्च प्रतिचे कामगंध साफळे लावावे. लाईट ट्रॅपचा वापर करावा. आपल्या शेजारी असलेल्या शेतकºयालाही दक्षता घ्यायला लावावी. वेळोवेळी निरीक्षण ठेवून, निंबोळी अर्काची फवारणी करावी, कपाशी शेजारी साफळा पीक म्हणून भेंडी लावावी.- डॉ. विद्या मानकर, कृषी अधिक्षक, वर्धा.गेल्या दोन तीन दिवसापासून बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढलेला असून कोरोझन सारखे महागडे औषध सुध्दा फवारून झाले. कामगंध साफळ्यामध्ये एकही पतंग आढळून आला नाही. अधिकाºयांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो. तरीही फायदा झाला नाही तर पर्यायी पीक घेण्यासंदर्भात विचार करीत आहो.-गणेश तिमांडे, शेतकरी.