शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

इसापुरातील जलयुक्त कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:32 IST

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली.याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, प्रभारी तहसीलदार बाळू भागवत, मंडळ कृषी अधिकारी सांगळे, सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानचे जिल्हा समन्वयक प्रवीण कुऱ्हे, सरपंच प्रणीता आंबटकर, उपसरपंच नितीन करपती आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कपासीच्या पिकावर येणाऱ्या बोंडअळीवर उपाय म्हणून बसविण्यात येणाºया रक्षक ट्रॅप बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच हे रक्षक ट्रॅप कमी खर्चात घरी कसे बनविता येईल या विषयी सोप्या शब्दात माहिती दिली. शेतकºयांनी रासायनिक खते व किटकनाशके न वापरता सेंद्रीय शेतीची कास धरली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी सेंद्रीय शेतीवर भर देवून बोंडअळी नियंत्रणाबाबत माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी शेतकरी विजय पोटे यांच्या शेतात बोंडअळी नियंत्रणासाठी लावलेल्या रक्षक ट्रॅपची पाहणी केली. तसेच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या व होत असलेल्या विविध कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंदू पोटे, विनय महाजन, पोलीस पाटील रमेश ढोकणे, ग्रामसेवक पुजा आडे, तलाठी मडावी, ग्राम परिवर्तन दूत सुदीप देशमुख, कृषी सहाय्यक योगीता केदार, मनोज साठे, कुणाल भामरे, राजू करपती आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalyukt Shivarजलयुक्त शिवार