शहरातील विकास कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:51 IST2017-12-01T00:50:55+5:302017-12-01T00:51:13+5:30
शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. बॅचलर रोड, अमृत योजना, भूमिगत मलनिस्सारण योजना, भूमिगत विद्युत वाहिनी आदी योजनांतील कामांचे........

शहरातील विकास कामांची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. बॅचलर रोड, अमृत योजना, भूमिगत मलनिस्सारण योजना, भूमिगत विद्युत वाहिनी आदी योजनांतील कामांचे नियोजन करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाºयांची समन्वय बैठक मंगळवारी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यानंतर अधिकारी व नगराध्यक्ष यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणीही केली.
बैठकीत शासकीय योजना, प्रकल्प यात कोणतीही अडचण न येता ते पूर्ण कसे करता येईल यावर चर्चा करण्यात आली. शहराचा विकास करताना नागरिकांना त्रास होणार याची काळजी घ्या. विकास कामे समन्वयाने करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तराळे यांनी केले. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मून, राणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता देवगडे, खासबागे, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पारधी, न.प. चे अभियंता फरसोले, पाणी पुरवठा विभागाचे सुजीत भोसले आदी उपस्थित होते.े