तळेगावात दारूबंदी मंडळात दारूविक्रेत्यांचाही शिरकाव

By Admin | Updated: January 10, 2015 01:52 IST2015-01-10T01:52:59+5:302015-01-10T01:52:59+5:30

जिल्ह्यात दारूबंदी असताना तळेगाव(टा.) येथे मुबलक दारू मिळत असे. त्यामुळे येथील महिलांनी कंबर कसली.

Insertion of liquor dealers in Talegaon liquor corporation | तळेगावात दारूबंदी मंडळात दारूविक्रेत्यांचाही शिरकाव

तळेगावात दारूबंदी मंडळात दारूविक्रेत्यांचाही शिरकाव

तळेगाव (टा.) : जिल्ह्यात दारूबंदी असताना तळेगाव(टा.) येथे मुबलक दारू मिळत असे. त्यामुळे येथील महिलांनी कंबर कसली. तरीही दारू थांबत नसल्याने येथील ठाणेदारांनी दारूविक्रेत्यांनाच दारूबंदीचे आवाहन केले. त्यामुळे दारूविक्रेत्यांनी पुरुष दारुबंदी मंडळाची स्थापना केली. परंतु दोन गट गावात सक्रीय झाल्याने खरोखरच दारूबंदी होईल का, असा प्रश्न पडला आहे.
तळेगावात चार महिन्यांपूर्वी दारूचे पाट वाहत होते. गावात अराजकता पसरली होती. माजी सरपंचालाही जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. त्यामुळे माजी सरपंचानाने दारूबंदीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांना दारूबंदीसाठी निवेदन दिले. नव्याने सत्तारूढ झालेल्या ग्रामपंचायतने सुरवातीला दारूबंदी सहमत असहमत सर्वेक्षण करून चाचणी घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी नोंदणी केली.
यानंतर ग्रा.पं. मध्ये दारूविक्रेत्यांची बैठक बोलावून सरपंच अतुल तिमांडे यांनी गावात १४ आॅगस्ट पासून गावात दारूबंदी होईल. त्यामुळे तुम्ही दारूबंदी करा, अशा सूचना केल्या. यावर दारूविके्रत्यांनी दुजोरा देत राहिलेला मात विकण्याची एक महिन्याची परवानगी मागितली. नंतर १४ आॅगस्टपासून दारूबंदीबाबत विशेष सभा घेण्यात आली. यावेळी गावातील तंटे सोडविण्याकरिता व दारूबंदी करण्याकरिता महिलांशी चर्चा करून तेजस्विनी मंडळाची स्थापना केली.
अल्लीपूर पोलीस ठाण्याला नव्याने रुजू झालेले ठाणेदार मगर यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये दारूबंदी बाबत सभा बोलावल्या. शिवाय वेळोवेळी पोलिसाचा ताफा गावात येत असे. आॅगस्ट महिन्यापासून गावातील महिला मंडळ दररोज संध्याकाळी दोन तास फिरून आढावा घेत असे. त्यामुळे दारूविक्रेत्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला होता.
कालांतराने मोबाईलवर लोकेशन मिळवून छुप्या मार्गाने काही मद्यप्रीय दारू मिळवू लागले. याचा त्रास दारू विक्री करणे सोडलेल्यांनाही होत होता. त्यामुळे दोन दिवसापूर्वी अल्लीपूरचे ठाणेदार भानुदास पिदोरकर यांनी दारूविक्रेत्यांची चर्चा केली.
चर्चेअंती दारूविके्रत्यांनीच गावात पूर्णपणे दारूबंदीचा निर्णय घेतला. अल्लीपूर पोलीस स्टेशनला जाऊन पुरूष दारूबंदी मंडळाची स्थापनाही केली. एवढेच नाही तर ठाणेदाराच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या निनादात रॅलीही काढली. गावात एक तेजस्विनी महिला मंडळ व दुसरे पुरूष मंडळ असे दोन गट दारूबंदीसाठी सक्रीय झाले आहे. त्यामुळे खरोखरीच दारूबंदी होईल की यातून नवा वाद उत्पन्न होईल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)

Web Title: Insertion of liquor dealers in Talegaon liquor corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.