आश्रम प्रतिष्ठानातील वादाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 05:00 AM2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:00:12+5:30

सर्व सेवा संघाच्या कार्यकारणीची बैठक केरळ राज्यातील कोट्टम या ठिकाणी २९ मार्च २०२० रोजी होणार होती; पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे ही बैठक स्थगित करण्यात आली होती. सदस्याची विचार विनिमय बैठक होणे कठीण असल्याने सोमवारी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून बैठक घेण्यात आली.

An inquiry will be held into the dispute in the ashram establishment | आश्रम प्रतिष्ठानातील वादाची होणार चौकशी

आश्रम प्रतिष्ठानातील वादाची होणार चौकशी

Next
ठळक मुद्देविशेष समितीचे गठन : ऑनलाईन झालेल्या गांधीवाद्यांच्या बैठकीत झाला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सर्व सेवा संघाच्या कार्यकारणीची बैठक प्रथमच आनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान बाबत निर्माण झालेल्या विवादात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. शिवाय काही ठरावही पारित करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली आहे.
सर्व सेवा संघाच्या कार्यकारणीची बैठक केरळ राज्यातील कोट्टम या ठिकाणी २९ मार्च २०२० रोजी होणार होती; पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे ही बैठक स्थगित करण्यात आली होती. सदस्याची विचार विनिमय बैठक होणे कठीण असल्याने सोमवारी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आसाम, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश अशा तेरा राज्यातील १६ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या विवादाबाबत वेगवेगळे वृत्त प्रकाशित झाल्याने सर्व सेवा संघांने याबाबत चिंता व्यक्त करून समस्येच्या समाधानासाठी जयपूरच्या भवानी शंकर कुसुम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती या बैठकी दरम्यान गठीत केली आहे. यात जयवंत मठकर, लक्ष्मी दास अरविंद रेड्डी यांचा समावेश आहे. ही समिती आश्रम बाबत आपला अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करणार आहे.

या प्रस्तावांवर झाली चर्चा
सदर बैठकीत लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आणि मजुरांचे जे हाल झाले त्यावर चिंता व्यक्त करून प्रस्ताव पारीत करण्यात आला. यात देशातील वेगवेगळ्या राज्यातील मजूर इतर राज्यात कामासाठी जातात. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. यात मजूर पायदळ आपापल्या गावाच्या दिशेने निघाले. काहींचा वाटेत मृत्यू झाला. सरकारणे कोणतीही उपाययोजना केली नाही. सर्वोदय कार्यकर्ते, विविध संघठनांनी मदत केल्याने त्यांचे सर्व सेवा संघाच्यावतीने यावेळी आभार मानण्यात आले.
अमेरिकेतील वर्णद्वेशाचे शिकार झालेले जार्ज फ्लायड यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करून न्याय मिळावा तसेच त्यांच्या परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करण्यात आली.
वाशिंग्टन मध्ये विश्ववंद्य महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा अपमान करण्यात आला. गांधीजी नेहमीच रंगभेद, भेदभाव यांच्या विरोधात राहिले आहे अशा महामानवाच्या प्रतिमेचा अपमान मानवतेला कलंकित करणारा असून सदर घटनेचा निषेध करण्यात आला.
लॉकडाऊन कारणाने लोकसेवक आणि सर्वोदयमित्राच्या कार्यकाळाचा नूतनीकरण कालावधी वाढविला असून तो ३१ जुलैपर्यंत सेवाग्राम येथील सर्व सेवा संघांच्या राष्ट्रीय कार्यालयात शुल्कासह पत्रक भरून द्यायचे यावेळी ठरविण्यात आले.
सर्व सेवा संघांचे पुढील अधिवेशन डिसेंबर महिन्यात घेण्याचा मुद्दा सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांनी मांडला. सर्वांनी त्याचा स्विकार केला आणि अखिल भारत आयुर्विज्ञान संस्थानच्या निदेर्शाप्रमाणे सभा, संमेलन या स्थितीत होणे कठीण आहे. त्यामुळे अध्यक्षाना दिनांक, स्थान नक्की करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला.
निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती अगोदरच करण्यात आलेली आहे. निवडणूक नंतर निकाल जाहीर होणार असून तो पर्यंत अस्तित्वात असलेली सर्व सेवा संघांची कार्यकारणी व अध्यक्ष कार्यरत राहणार आहे.

Web Title: An inquiry will be held into the dispute in the ashram establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.