शालेय पोषण आहारात अफरातफर प्रकरणी चौकशी सुरू

By Admin | Updated: January 7, 2015 22:57 IST2015-01-07T22:57:48+5:302015-01-07T22:57:48+5:30

तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथील उच्च प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचा चार क्विंटल तांदुळ शिल्लक आढळला़ यात ग्रामस्थांनी मुख्याध्यापकावर संशय घेत अफरातफरीची तक्रार केली होती़

Inquiries in the School Nutrition Concerns | शालेय पोषण आहारात अफरातफर प्रकरणी चौकशी सुरू

शालेय पोषण आहारात अफरातफर प्रकरणी चौकशी सुरू

सेलू : तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथील उच्च प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचा चार क्विंटल तांदुळ शिल्लक आढळला़ यात ग्रामस्थांनी मुख्याध्यापकावर संशय घेत अफरातफरीची तक्रार केली होती़ या प्रकरणी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या आदेशावरून चौकशी अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ यात खरोखरच मुख्याध्यापक दोषी आहे काय, हे गुढही उकलले जाणार आहे़
बोरी कोकाटे येथील शाळेत शालेय पोषण आहारात अफरातफर केल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत होता़ याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारही करण्यात आली़ यावरून चौकशीची प्रक्रिया सुरू झाली़ यात गटशिक्षणाधिकारी संजय वानखेडे व सभापती मंजुषा दुधबडे हे चौकशीला गेले असता शाळेमध्ये चार क्विंटल तांदुळ शिल्लक असल्याचे आढळून आले़ शाळेतील तांदळाची अफरातफर करण्यात आल्याचे दिसून आले नाही; पण स्टॉक रजिस्टरमध्ये शिल्लक तांदळाची नोंद ठेवण्यात आली नसल्याचे दिसून आले़ या तांदळाची मुख्याध्यापक अफरातफर करणार असल्याचा संशय घेत काही ग्रामस्थांनी तक्रार केली़ या तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीही झाली़ या प्रकरणी शालेय पोषणच्या अधीक्षिका यांना वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
शालेय पोषण आहारात अफरातफर तक्रारीमुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे़ शाळेत तांदुळ शिल्लक का राहिला व तो स्टॉक रजीस्टरमध्ये नोंद का नाही, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत़ शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रकरण गंभीरतेने घेत चौकशी सुरू केल्याने ग्रामस्थांत समाधान असले तरी सध्या सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inquiries in the School Nutrition Concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.