शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

पालिकेची टाळाटाळ अन् जि.प.चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:34 IST

शहरात अद्यावत सांस्कृतिक भवन उभारण्याकरिता २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. याची जबाबदारी सुरुवातीला पालिकेकडे सोपविण्यात आली; पण पालिकेने जागेच्या शोधातच आपला वेळ दवडल्याने सांस्कृतिक भवनाचा प्रश्न खितपत पडला होता. अखेर जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करुन देत महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात सांस्कृ तिक संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत सोमवारी सर्वानुमते ठरावही पारीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांस्कृतिक संकुल : गांधी विद्यालयाच्या परिसरात साकारण्याचा स्थायी समितीत ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात अद्यावत सांस्कृतिक भवन उभारण्याकरिता २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. याची जबाबदारी सुरुवातीला पालिकेकडे सोपविण्यात आली; पण पालिकेने जागेच्या शोधातच आपला वेळ दवडल्याने सांस्कृतिक भवनाचा प्रश्न खितपत पडला होता. अखेर जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करुन देत महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात सांस्कृ तिक संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत सोमवारी सर्वानुमते ठरावही पारीत करण्यात आला आहे.शहरात अद्यावत सांस्कृतिक सभागृह उभारण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबीत होती. यासाठी शहरातील विविध संघटना व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष बाब म्हणून सांस्कृतिक भवनासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. यातील ५ कोटी रुपये सांस्कृतिक मंत्रालयाकडून दिले जाणार असून उर्वरित निधी वित्त मंत्रालयाकडून दिला जाणार आहे.हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आला असून नगर पालिका यासाठी जागा उपलब्ध करुन देणार होती; पण नगर पालिकेकडून जागाच उपलब्ध झाली नसल्याने अखेर जिल्हा परिषदने सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी सांस्कृतिक संकुलाचा मुद्दा उपस्थित केला. बसस्थानकालगत असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात हे संकुल उभारण्याबाबत सभागृहाने सर्वानुमते ठराव पारीत केला आहे.त्यामुळे आता शहरातील सांस्कृतिक संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समितीच्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या सभागृहात जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री गफाट, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण समिती सभापती निता गजाम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व सर्व विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. जागेसाठी अडकेलेला हा विषय अखेर आज मार्गी लागला, हे विशेष.गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविणारजिल्ह्यात गोवर रुबेला लसिकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासंदर्भातही सभागृहात चर्चा करण्यात आली. या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून मोहिम यशस्वीकरण्यासाठी जिल्हा परिषद सर्कलमधील जिल्हा परिषद सभापती, सदस्य तसेच पंचायत समिती सर्कलमधील पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आणि नगरपालिका क्षेत्रातील नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधींचा विचारात घेऊन सर्वांना सोबत घेऊन या मोहिमेचा कार्यक्रम आखावा आणि त्यानुसार यशस्वीरित्या पार पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.स्थायी समितीच्या बैठकीत अद्यावत सांस्कृतिक सकुलाकरिता जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर हे संकुल उभारण्यात येणार आहे. वेळ पडल्यास नियमानुसार रक्कमही भरण्यात येईल कारण यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीस मदत मिळणार आहे.- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.