भाऊ-बहिणीच्या नात्यातही महागाई

By Admin | Updated: August 18, 2016 00:43 IST2016-08-18T00:43:36+5:302016-08-18T00:43:36+5:30

भाऊ-बहिणीच्या नात्याची रेशमी वीण अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणाला राखीचे महत्त्व अनन्यसाधारण असते.

Inflation in relation to brother and sister | भाऊ-बहिणीच्या नात्यातही महागाई

भाऊ-बहिणीच्या नात्यातही महागाई

दहा दिवसांत लाखोची उलाढाल : खादीच्या राखीची क्रेझ
वर्धा : भाऊ-बहिणीच्या नात्याची रेशमी वीण अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणाला राखीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. भावाच्या मनगटावर रेशमी धागा बांधून बहीण त्याच्याकडे सुरक्षेची हमी मागते; पण कालानुरूप सण साजरे करण्याच्या परंपरा बदलतात. याचा प्रभाव या सणावर दिसून येतो. राखी म्हणजे रेशमी धागा हे समीकरण मागे पडले असून त्याची जागा आता फॅन्सी राख्यांनी घेतली आहे. या सणानिमित्त राखी खरेदीत होणारी उलाढाल लाखोची असते.
अन्य वस्तूत झालेल्या भाववाढीप्रमाणे यंदा राखीचे भाव चढेच आहे. मागील वर्षी ५ ते १० रुपयांना मिळणारी राखी यंदा १५ रुपयांपासून आहे. ग्राहकांकडून स्टोन वर्क, जरदोसी वर्क, कुंदण वर्क राखीला अधिक मागणी असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली; पण यातही रेशमी राखी कुठेच मागे पडली नाही. रेशमी राखीचे महत्त्व आजही अबाधित आहे. राखीनिमित्त शहरातील सर्व प्रमुख रस्ते व बाजारपेठेत दुकाने सजली आहे. खरेदीकरिता महिला वर्गाची झुंबड पाहायला मिळत आहे. भावाकरिता व बहिणींकरिता खास भेटवस्तू घेण्यासाठी दुकांनात गर्दी दिसून आली.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Inflation in relation to brother and sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.