फुलकोबीवरही कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: January 6, 2015 23:05 IST2015-01-06T23:05:14+5:302015-01-06T23:05:14+5:30

गत दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने येथील भाजी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वातवारणामुळे फुलकोबीवर अळ्यांनी हल्ला केला असून पीक धोक्यात आले आहे.

Infestation of pests and pests on cauliflower | फुलकोबीवरही कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव

फुलकोबीवरही कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव

सेलू : गत दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने येथील भाजी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वातवारणामुळे फुलकोबीवर अळ्यांनी हल्ला केला असून पीक धोक्यात आले आहे. या अळ्यांचा बंदोबस्त करण्याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे़
फुलकोबीचे पीक फुलावर येण्यापूर्वीच पानावर रस शोषणाऱ्या किडी व मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे फवारणीच्या खर्चाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कोबी पीक महागडे आहे. या पिकाचे १०० ग्रॅम बियाणे ३ हजार रुपयांत विकत घ्यावे लागते़ चार एकर कोबीच्या शेतीला सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे बियाणे लागते़ शिवाय मजुरी, रासायनिक खत फवारणी, डवरणी आदी खर्च एक लाखांपेक्षा अधिक येतो; पण सध्या ढगाळ वातावरणाने फुलकोबीचे पीक घेणारा शेतकरी संकटात सापडल्याचे दिसते़(शहर प्रतिनिधी)

Web Title: Infestation of pests and pests on cauliflower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.