स्वतंत्र समता शिक्षक संघाची बैठक
By Admin | Updated: April 16, 2016 01:38 IST2016-04-16T01:38:17+5:302016-04-16T01:38:17+5:30
स्वतंत्र समता शिक्षक संघाची बैठक चैतन्य कॉलनी सावंगी (मेघे) येथे सरचिटणीस गौतम पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.

स्वतंत्र समता शिक्षक संघाची बैठक
वर्धा : स्वतंत्र समता शिक्षक संघाची बैठक चैतन्य कॉलनी सावंगी (मेघे) येथे सरचिटणीस गौतम पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुनील तेलतुंबडे तर मार्गदर्शक म्हणून दिलीप वावरे, धमेंद्र अंबादे, सुरेखा ढाले व सुरेश सांगोले उपस्थित होते.
बैठकीत संघटनेचे कार्य व विस्तार याविषयी माहिती देण्यात आली. यापुढे संघटनेचे नाव ‘स्वातंत्र समता शिक्षक संघ’ असे राहील हे जाहीर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व संघटनेचे योगदान, १४ एप्रिल पूर्वी वेतन न झाल्यास संघटनेची भूमिका, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची शासनाची भूमिका, डीसीपीएस कपात बंद करणे व जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांच्या समस्या व त्यावरील मार्ग, मोक्याच्या जागी मागासवर्गीयांना हेतुपुरस्पर डावलणे, बिन्दुनामावलीतील घोळ, जि. प. बॅँक निवडणूक व पूर्वतयारी, शिक्षक समायोजन व पदोन्नती इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक गौतम पाटील यांनी केले आभार दीपक नगराळे यांनी मानले. जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे निवडक सदस्य बैठकीला उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रकाश पखारे, दिलीप कांबळे, महेंद्र आडे, विलास आटे, किशोर वानखेडे, दीपचंद भगत, सचिन शंभरकर, विक्रम तामगाडगे यांनी केले.(शहर प्रतिनिधी)