शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 08:09 IST

राहुल गांधी : मोदींची चौकीदारी श्रीमंत उद्योगपतींपुरतीच

योगेश पांडे/राजेश भोजेकर/ अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर/वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास २०१९ मध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर करताना कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प केला जाईल, असे आश्वासन कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्धा येथे आयोजित जाहीर सभेत दिले. तत्पूर्वी त्यांनी चंद्रपूर चांदा क्लब मैदान येथील सभेत पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. शेतकरी, कामगार वर्ग यांच्या घरासमोर कधीही चौकीदार नसतो. केवळ अंबानी, अदानी यासारख्या धनाढ्य उद्योगपतींच्या घरासमोरच चौकीदार दिसून येतो. त्यांची चौकीदारी ही श्रीमंत उद्योगपतींपुरतीच मर्यादित आहे, या शब्दांत हल्लाबोल केला.

आपल्या देशात पैशाची कमी नाही. मात्र शासनाकडून जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी, मजुरांना देण्यासाठी पैशांची अडचण असल्याचे सांगितले जाते, मात्र अंबानीसारख्या उद्योगपतींना कर्जवाटप करण्यात येते. हेच अंबानीसारखे लोक मोदींचे मार्केटिंग करतात. गरिबांना नसाल देत, तर मग उद्योगपतींना सरकार पैसे का देते, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आम्ही निवडणुकांनंतर जीएसटीमध्ये बदल करू व करप्रणाली सुलभ करून एक देश एक कर प्रणाली आणू. मोदी यांची १५ लाखांची कल्पना मला पण आवडली होती. पण ते आश्वासन पोकळ होते हे काळाच्या ओघात सिद्ध झाले, असा चिमटादेखील त्यांनी काढला.

वर्धा येथील सभेतही राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकारचे गरीब शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांकडे दुर्लक्ष झाले. सत्तेत आल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग फॅक्टरी शेताजवळच तयार करू, असे ते म्हणाले.चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर, गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी तर वर्धा येथील उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्या प्रचारासाठी या सभा झाल्या.प्रमुख मुद्देच्ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला. त्यादिवशी देश दु:खात होतात. मात्र नरेंद्र मोदी हे त्यावेळी अदानी यांना सहा विमानतळ देण्यास व्यस्त होते.च्मोदी यांनी नियमांना धाब्यावर बसवून विमान बनविण्याचा कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांना राफेल करारात फायदा मिळवून दिला.च्सत्तेवर आलो तर महाराष्ट्रात अन्नप्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण करू.मोदींनी केला अडवाणींचा अपमानसध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र, मोदींनी त्यांना डावलले. लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करून भाजपाच्या स्टेजवरून उतरवण्यात आले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

वर्धा-नागपूर इनोव्हातून प्रवास; ढगाळ वातावरणाचा परिणामराहुल गांधी वर्धा येथे चंद्रपूर येथून ५ वाजून ७ मिनीटांनी हेलिकॉप्टरने आले. त्यानंतर ६ पर्यंत ते वर्धेत होते. सभा संपताच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हेलिकॉप्टरच्या चालकाने हेलिकॉप्टर नेणे धोक्याचे ठरू शकते. असे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण दोघेही इनोव्हा गाडीतून नागपूर विमानतळावर आले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस