स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना थांबवावी

By Admin | Updated: August 9, 2014 01:46 IST2014-08-09T01:46:34+5:302014-08-09T01:46:34+5:30

गत काही वर्षापासून स्वातंत्र्यदिनी लहान मुलांना कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वितरित केले जातात. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर ते इतरत्र फेकल्या जातात.

Independence Day should stop the rejection of national flag | स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना थांबवावी

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना थांबवावी

वर्धा : गत काही वर्षापासून स्वातंत्र्यदिनी लहान मुलांना कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वितरित केले जातात. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर ते इतरत्र फेकल्या जातात. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हे राष्ट्रध्वज गोळा करण्याचे काम केले जाते. याला सहकार्य करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रध्वज असे इतरत्र फेकून दिल्याने त्याचा अपमान होतो. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याबाबत आजच्या पिढीला योग्य ती शिकवण मिळत नसल्याचे दिसून येते. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. याचे विस्मरण होऊन १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी या वेळी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे हे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. शिवाय प्लास्टिकच्या वापरामुळे ते लगेच नष्टही होत नाही. त्यामुळे अनेक दिवस राष्ट्रध्वजाची ही विटंबना होत राहाते. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वज गोळा करून ते पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे सन्मानाने जमा करण्याची मोहिम राबविते. गत नऊ वर्षापासून हिंदू जनजागृती समिती शासन, प्रशासकीय अधिकारी, पोलीस आदींना वेळोवेळी निवेदने देऊन राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करीत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार संबंधित अधिकारी व सर्व जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर न करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात अतुल शेंडे, हितेश निखार, शशीकांत पाध्ये, अरूण माणिकपुरे, जयश्री माणिकपुरे, विजय भाळे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Independence Day should stop the rejection of national flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.