गिरड जंगल परिसरात मोरांच्या शिकारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:05+5:30

त्या पर्यटन स्थळात मोर आढळण्यामागे कारण म्हणजे उत्तम जैवविविधतेमुळे आणि पोषक वातावरणामुळे मोरांचा अधिवास येथे नेहमी असतो मात्र या मोहक राष्ट्रीय पक्ष्यांला शिकाऱ्यांची वक्रदृष्टी लागली आहे. या परिसरात मोरांचा स्वच्छंदी वावर असल्याने या मोरांना शिकारी आपले लक्ष्य करीत आहे. या परिसरात शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहेत. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Increase in peacock hunting in Gird forest area | गिरड जंगल परिसरात मोरांच्या शिकारीत वाढ

गिरड जंगल परिसरात मोरांच्या शिकारीत वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभाग अनभिज्ञ : जनजीवन सुनसान

लालसिंह ठाकूर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : हे पर्यटनात समाविष्ट केलेले गाव आहे. या गावाला निसर्गाची कृपादृष्टी लाभली आहे. आजुबाजुचा संपूर्ण परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. शेख फरीद देवस्थान टेकडी हे त्याच एक उत्तम उदाहरण आहे. या टेकडीच्या मागच्या बाजुला घनदाट जंगल असून या परिसरात वर्षभर हिरवळ असते. त्यामुळे टेकडीवरून पर्यटक या गोष्टींचा आनंद घेतात. या टेकडीला लागुनच खुर्सापार जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राणी, पक्ष्यांचा या ठिकाणी मुक्तसंचार असतो. राष्ट्रीय पक्षी मोर हा येथे ेनागरिक,पर्यटकांना मुक्तपणे वावरतांना आढळतो. त्या पर्यटन स्थळात मोर आढळण्यामागे कारण म्हणजे उत्तम जैवविविधतेमुळे आणि पोषक वातावरणामुळे मोरांचा अधिवास येथे नेहमी असतो मात्र या मोहक राष्ट्रीय पक्ष्यांला शिकाऱ्यांची वक्रदृष्टी लागली आहे. या परिसरात मोरांचा स्वच्छंदी वावर असल्याने या मोरांना शिकारी आपले लक्ष्य करीत आहे. या परिसरात शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहेत. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात हरीण, ससे, निलगाय, मोर, अस्वल, बिबट अशा विविध प्राण्यांचा मुक्त संचार आहे. मात्र गावागावातील तस्करापासून वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र मानवी हालचाल थंडावल्या आहेत. निर्जन रस्ते वनविभाग हलगर्जीपणा यामुळे गेल्या काही दिवसापासून तस्करांनी आपला मोर्चा मोराकडे वळविला आहे. वाढणाºया शिकारीमुळे परिसरातील वन्य पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. या परिसरातून मोर नामशेष होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन काळात सर्व कामे बंद असताना वनविभाग सक्रियपणे जबाबदारी पार पाडत होता. वनरक्षकासोबत मी स्वत या भागात गस्त घालत होतो. काही शिकाऱ्यांनी आपला मोर्चा मोर्चाकडे वळविला ही माहिती गावातील तरुणाकडून मिळताच खबरदारीचे उपाय म्हणून पुन्हा गस्त वाढविण्यात येईल.मोरांच्या शिकारीवर आळा घालण्यात येईल
- एस.एन.नरडंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, गिरड.

Web Title: Increase in peacock hunting in Gird forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.